Nilanga Assembly Constituency : तुम्ही संभाजी पाटलांना निवडून द्या, मंत्री करण्याची जबाबदारी माझी

Ramdas Athawale promised to make Nilangekar a minister : जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत मी आहे. आणि जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत, अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी केली.
Athawale-Nilangekar New
Athawale-Nilangekar NewSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सतत छळले, लोकसभा निवडणुकीत त्यांना दोनदा पराभूत केले, त्या काँग्रेसला हद्दपार करून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तुम्ही संभाजी पाटील यांना निवडून पाठवा, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी, असा शब्द आठवले यांनी यावेळी दिला.

निलंगा येथे संविधान सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Sambhaji Patil Nilangekar) यावेळी माजी खा.अमर साबळे, माजी.खा .सुनिल गायकवाड,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष बाबा कांबळे,उपाध्यक्ष अंकुश ढेरे,साधू कटके,सुधीर पाटील यांची उपस्थिती होती. मागील 65 वर्षांमध्ये काँग्रेसने केवळ जातीपातीचे राजकारण केले.

Athawale-Nilangekar New
Nilanga Assembly Constituency : निलंग्यातील 'निष्ठावंत काँग्रेस' कार्यकर्त्यांची पावले चालती भाजपची वाट!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीने फेकाफेकी केली, परंतु संविधानामुळे देशाच्या सर्वोच्च पदावर एक सामान्य माणूस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षमपणे काम करत आहेत. (Ramdas Athawale) या देशाचा जलद गतीने विकास होत आहे. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत मी आहे. आणि जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत, अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी केली.

Athawale-Nilangekar New
BJP Manifesto : शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी दरमहा 2100 रुपये, भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा!

आज पर्यंतच्या पंतप्रधानापैकी मोदी यांच्याशिवाय संविधानावर कोणी माथा टेकवला होता का? असा सवाल आठवले यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई व भंडाऱ्यामधून निवडणुकीत पाडण्याचे पाप काँग्रेसने केले. सध्याच्या केंद्र व राज्यातील महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले असून इंदू मिलची सहाशे कोटींची जमीन दिली. त्या जमिनीवर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्मारक होत आहे.

Athawale-Nilangekar New
Mahayuti News : पाठिंब्याबाबत भाजपची चुप्पी, अधिकृत उमेदवार शिंदेंचा का दादांचा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची कामे सक्षमपणे सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना वर्षाकाठी 18 हजार रुपये मिळत आहेत. महायुतीच्या जाहीरनाम्यात दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे म्हटले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीर पणे राहा, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मजबूत करण्यासाठी संभाजी पाटलांना विजयी करा, त्यांना मंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.

Athawale-Nilangekar New
Sambhaji Patil Nilangekar : जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढेल, संभाजी पाटील निलंगेकर यांचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा `सबका साथ सबका विकास` हा नारा दिला आहे. परंतु संविधान बदलणार म्हणून अपप्रचार करणाऱ्याचा `बजा देंगे बाजा` म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाजांना न्याय देण्याचे काम केल्याचे आठवले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटीव्ह चा वापर करून मागासवर्गीयाचे मते मिळवण्याचा प्रयत्न झाला. संविधाना समोर नतमस्तक होणारे एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी असून भारताचे संविधान एक आदर्श दागिना असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com