Pankaja Munde, Dhanjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde: पंकजा मुंडेंचे भरसभेत मोठं विधान; म्हणाल्या, 'धनंजय मुंडेंनी कमळच हाती घेतलं असतं तर...

Pankaja Munde Statement on Dhananjay Munde: महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रचारसभेत बोलताना मोठे विधान केले आहे.

Sachin Waghmare

Beed News : विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचा दहा दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने जोर लावला आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रचारसभेत बोलताना मोठे विधान केले आहे.

परळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कृषी मंत्री धनंजय मुंडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष परळीतील निवडणुकीकडे लागले आहे. प्रचार सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतले असते तर बरे झाले असते असे वक्तव्य भाजप (Bjp) नेत्या, विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले आहे.

तुम्ही मतदानाला गेल्यावर तुमच्या डोक्यात कळम चिन्ह येईल, तुम्ही मशीनवर कमळ चिन्ह शोधाल. पण तुमच्या डोक्यात कमळ असू द्या. भाजपचे कमळ डोळ्यासमोर धरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचं बटण दाबा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले . बीड जिल्ह्यातील परळीतून धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी सभा घेतली. यावेळी धनंजय मुंडे त्यांच्या सोबत एकाच मंचावर असतानाच त्यांनी मनातील खंत व्यक्त केली

यापूर्वीच्या निवडणुकीत आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरोधात खूप ऊर्जा वाया घालवली, असे सांगत असताना धनंजय मुंडे यांनी कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होते, असे वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी मनातील खंत बोलून दाखवली. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचे आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकाना केले.

या देशात अनेक परिवार एकमेकाविरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते पैशाची सत्तेची नसते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT