Uddhav-Thackeray-Eknath-Shinde Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Hingoli MLC election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांची 'एन्ट्री'! महायुती अन् मविआचे गणित बिघडणार; निवडणुकीत कोणाला बसणार फटका?

MLC election News : निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या उमेदवाराविरोधात स्वपक्षीय मंडळीने बंडखोरी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Parbhani News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या रिंगणातून बंडखोर उमेदवार माघार घेणार का? याकडे लागले आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत चुरस पाहावयास मिळत आहे. याठिकाणी महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे डॉ, विवेक नावंदर रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे मात्र या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या उमेदवाराविरोधात स्वपक्षीय मंडळीने बंडखोरी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम दोंन्ही पक्षात झालेल्या बंडखोरांमुळे पेटला आहे. त्याचा फटका येत्या काळात मविआ की महायुती यापैकी कोणाला बसणार याची उत्सुकता लागली आहे. या मतदारसंघातील महायुतीमधील शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार सईद खान यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू मेहराज खान यांनी मागे घेतला आहे. मेहराज खान यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी हा अर्ज माघारी घेतला आहे. त्यानंतरही निवडणूक रिंगणात आणखी सात उमेदवार असल्याने जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी कायम आहे. मात्र ही बंडखोरी मोडण्यासाठी आता प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. महायुती मधील शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे विजय जामकर आणि संग्राम जामकर तसेच, भाजप (BJP) नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हीच बंडखोरी शमावण्यासाठी उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत हे गुरुवारी परभणीत येणार आहेत. त्यांच्याकडून या बंडखोर मंडळींना शांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

परभणीत मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे बंड क्षमते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सामंत यांच्याकडून या तीन नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्याबाबत सूचना केल्या जाणार आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील उबाठा सेनेचे उमेदवार विवेक नावंदर हेही काँग्रेसचे बंडखोर सुशील देशमुख यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती करणार आहेत. तसेच त्यांनी शिवसेनेकडे ही त्यांनी याबाबत कळवले असून शिवसेनेच्या नेतृत्वाकडूनही काँग्रेस नेतृत्वाला संपर्क केला जात आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत कोणाला बसणार फटका?

दरम्यान, परभणी-हिंगोली मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहिले असता एकूण 473 मते आहेत. त्यामध्ये भाजप 111, एकनाथ शिंदे शिवसेना 74, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 123 असे महायुतीचे 308 मतदार आहेत तर त्यांच्या विरोधातील आघाडी व अपक्ष मिळून 165 मते आहेत. त्यामुळे महायुतीची हक्काची मते फुटल्याशिवाय महाविकास आघाडीला विजय मिळवणे सोपे जाणार नाही. त्यातच राष्ट्रवादी अथवा भाजपच्या उमेदवाराची बंडखोरी कायम राहिल्यास खान यांच्या अडचणीत वाढ हॊणार आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या देशमुख यांच्या बंडखोरीचा फटका ठाकरे सेनेच्या नावंदर यांना बसू शकतो, त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT