Loksabha Election : परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची मंगळवारी (ता.23) जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधी उमेदवाराचे डिपाॅझिट जप्त करण्याचे आव्हान केले. परभणीत संजय जाधव यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर यांचे आव्हान असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर महादेव जानकर यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
मी गेला महिनाभर परभणी लोकसभा Parbhani LokSabha मतदारसंघात फिरलो आहे. साडेचार लाख मतांच्या लीडने मी निवडून येईल. लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. जर मी परभणीतून पराभूत झालो तर संन्यास घेईल, अशी घोषणा महादेव जानकर Mahadev Jankar यांनी केली.
परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर बाहेरचा उमेदवार म्हणून टीका करण्यात आली. मात्र, आपण घर घेऊन परभणीतच राहणार असल्याचे सांगत महादेव जानकरांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. संजय जाधव यांच्यावर टीका करताना त्यांचा अभ्यास नाही, असेदेखील जानकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री आणि माझ्यासारखा बहुजनाचा पोरगा खासदार झालेला पाहवत नाही. मी 26 एप्रिलनंतर राज्यभर फिरून उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार आहे, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत मतदान होत आहे. त्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे, तर मंगळवारी (ता. 23) भरपावसात सभा घेतली.Lok Sabha Election 2024 : अखेर अखिलेश यादवही लोकसभेच्या रिंगणात; लालूंच्या जावयाचा पत्ता कट करण्यात आला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.