Parbhani News : परभणी महापालिका निवडणुकीत युती-आघाडी होणार की नाही? यावर दोन्ही पक्षातील घटक पक्षांमध्ये अजूनही चर्चा सुरूच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक असताना सुरु असलेला हा घोळ पाहता दोन्ही बाजूच्या इच्छुक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संयम सुटत आहे. भाजपचे नेते, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या पुतण्याने आणि विजय वरपूडकर यांचे चिरंजीव ऐश्वर्य यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायुतीलाच धक्का दिला आहे. या शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे एक पदाधिकारीही अजितदादांच्या पक्षात गेला आहे. राष्ट्रवादीचा एक माजी नगरसेवक मात्र भाजपमध्ये गेला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी युती व आघाडीचा घोळ काही संपता संपत नसून अस्वस्थ झालेले अनेक मातब्बर इच्छुक उमेदवार पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षात प्रवेश करुन निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवारास आव्हान देण्यासाठी उतरत आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना महायुतीतील भाजप, शिवसेना युतीची, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी आघाडीची घोषणा अद्यापही केलेली नाही. त्यामुळे या पक्षाकडे उमेदवारीसाठी शेकडोच्या संख्येने असलेले इच्छुक अस्वस्थ झाले आहेत.
त्यात पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा भरणा आहे. आपल्यासमोर पक्षात येणाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी पायघड्या घातल्या जात असताना वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून, नेत्यांच्या निवडणुकांत पडेल ती कामे करुनही जर पक्ष उमेदवारीबाबत विचार करीत नसेल तर आता आपणच विचार करण्याची वेळ आली आहे असे समजून अनेकजण पक्षांतराच्या तयारीत असून काहींनी पक्षही सोडला आहे.
पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेने अनेक जण दररोज सकाळ-संध्याकाळ पक्ष कार्यालयाच्या, नेतेमंडळीच्या घराच्या खेट्या मारीत आहेत. स्वपक्षाचेच उमेदवार पक्षाचा रुमाल घालून प्रचारासाठी फिरत असतांना स्वतःला मात्र लटकवून ठेवल्याची सल अनेकांच्या मनात आहे. आपणही पक्षाचे उमेदवार आहोत म्हणून एकटे फिरतांना त्यांना नागरीकांच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण अस्वस्थ होत असून काही जण पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
उमेदवारी दाखल करण्याची तारीख तीन दिवसावर आलेली असतांना देखील नेतृत्व आपल्याला फिरवत असल्याची खात्री अनेकांनी झाली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात अनेक पक्षांतरे पहावयास मिळणार आहेत. काही जणांनी स्वपक्षात सर्वकाही सुरळीत असतांना देखील अन्य पक्षातील नेत्यांच्या आग्रहाखातर अन्य पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते विजय वरपुडकर यांचे चिरंजीव एैश्वर्य उर्फ टोनी वरपुडकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये उमेदवारी मागीतली होती. परंतु त्यांनी शुक्रवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात (अजित पवार) प्रवेश केला. आमदार राजेश विटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष माजी महापौर प्रताप देशमुख, विजय जामकर यांनी त्यांचे स्वागत केले.
त्याच बरोबर शिवसेनेचे (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे अर्जुन सुभाष सामाले यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गतवेळी सामाले यांच्या आई केवळ एका मताने पराभूत झाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.