Babajani Durani-Saeed Khan Clashesh In Pathri News Sarkarnama
मराठवाडा

Congress-Shiv sena News : पाथरीत 'खान विरुद्ध खान' संघर्ष; बाबाजानी अन् सईद खान समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी!

Local Body Election 2025 : पाथरीतील एकतानगर भागात रात्री हा प्रकार घडला. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा व सईद खान यांचा भाऊ यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी आणि दगडफेकीचा प्रकार घडला.

Jagdish Pansare

  1. पाथरी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान समर्थकांमध्ये तीव्र संघर्ष झाला.

  2. दगडफेक व हाणामारीच्या घटनांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

  3. या प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Pathri Municipal Council News : पाथरीच्या राजकारणात कायम एकमेकांना नडणारे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि शिवसेनेचे सईद खान यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना शहरातील एकतानगर भागात रात्री उशीरा दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले. दरम्यान, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सईद खान यांचे बंधू मेहराज खान यांनी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी आपल्या घरावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला.

या प्रकरणी त्यांनी पाथरी पोलीसात दाखल केलेल्या तक्रारीवरून जुनेद खान यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पाथरीतील या राड्यानंतर शहरात तणावाचे वातावरण असून दगडफेक आणि एकमेकांना शिवीगाळ केल्याचे प्रकार समोर आले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पाथरी शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्याविरोधात हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा तुफान राडा झाला. शहरातील एकता नगर भागात रात्री उशिरा शिवसेनेचे उमेदवार मेहराज खान यांच्या घरावर काँग्रेसचा रुमाल गळ्यात घालून आलेल्या 80 ते 90 जणांनी हल्ला केल्याचा आरोप केला.याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान अब्दुल्ला खान दुर्राणी यांच्यासह उमर खान, हमीद खान, जाफर खान, सैफउल्ला खान, रेहान खान, शेख मुस्ताक, अफिक तरबेज खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी संतप्त यांनी संतप्त प्रतिक्रिया देत हे आपल्या विरोधात विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. दरम्यान पाथरीमध्ये रात्री झालेल्या राड्यानंतर तणावाचे वातावरण असून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पाथरी शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दगडफेक आणि हाणामारीच्या प्रकारानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी विरुद्ध सईद खान असा संघर्ष भडकण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

पाथरीतील एकतानगर भागात रात्री हा प्रकार घडला. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा व सईद खान यांचा भाऊ यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी आणि दगडफेकीचा प्रकार घडला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मेहराज खान यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रचार संपल्यानंतर घरी जेवत असताना रात्री अकराच्या सुमारास काँग्रेसचा रुमाल गळ्यात घातलेले 80 ते 90 जण आपल्या घरावर चाल करून आले. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्यासह कोयते होते. दरवाजा लावून घेतल्यामुळे आपण बचावलो, हा हल्ला जीवघेणा होता अशी तक्रार मेहराज खान यांनी पोलीस दिली.

नऊ जणांवर गुन्हा

यावरून पाथरी पोलिसांनी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान यांच्यासह आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी हा विरोधकांचा आपल्या विरोधात कट असल्याचा आरोप केला आहे. एकतानगर भागातील कॉर्नर बैठक संपल्यानंतर अचानक आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर सईद खान यांनीही एकतानगर येथील आमच्या घरावर दगडफेक केली व आम्हाला शिवीगाळ केल्याचा आरोप दुर्राणी समर्थकांवर केला. बाबाजानी हे स्वतः गुंड घेऊन आले होते, असा दावा सईद खान यांनी केला आहे.

पाथरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून बाबाजानी दुर्राणी विरुद्ध सईद खान असा संघर्ष सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हे दोन गट एकमेकांच्या समोर आल्याने पाथरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांच्यावर परभणी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून पाथरीची नगरपरिषद राखण्यासाठी दुर्राणी यांनी आपली प्रतिष्ठा पणा लावली आहे. तर दुर्राणी यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सईद खान हे मैदानात उतरले आहेत. दोघांच्या राजकीय संघर्षामुळे पाथरीत खान विरुद्ध खान असे चित्र निर्माण झाले आहे.

FAQs

1. पाथरीत नेमका कशावरून संघर्ष झाला?

दोन्ही गटांच्या निवडणूक प्रचारावेळी तणाव वाढून वाद हिंसाचारात बदलला.

2. या संघर्षात कोणते प्रकार घडले?

दगडफेक, हाणामारी आणि गोंधळ झाल्याची माहिती आहे.

3. पोलिसांनी कोणती कारवाई केली?

पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

4. या घटनेचा निवडणूक वातावरणावर काय परिणाम झाला?

परिसरात तणाव वाढला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

5. संघर्षात कोणी जखमी झाले का?

प्राथमिक माहितीनुसार काही व्यक्तींना किरकोळ दुखापती झाल्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT