Babajani Durrani : माजी आमदार बाबाजानी दुर्रानींनी एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्याला केली मारहाण

Babajani Durrani Shiv Sena leader affiliated Eknath Shinde Parbhani Maharashtra politics : परभणीमधील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्याला मारहाण केली.
Babajani Durrani
Babajani DurraniSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे.

शिवसेनेचे आलोक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांनी बाबाजानी दुर्रानी यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

परभणीतील (Parbhani) पाथरी नगरपरिषदेमध्ये साई बाबा विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, मुख्याधिकारी कदम यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची व 144 मालमत्ताधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Babajani Durrani
Maharashtra politics news : बीडपाठोपाठ 'या' जिल्ह्यातही भाजप मंत्री अन् आमदारामधला वाद चिघळला...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी आलोक चौधरी यांनी पाथरी येथील घरकुल आणि शॉपिंग काम्प्लेक्समध्ये गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून बैठकीत वातावरण चांगलेच तापले होते. बैठक वादळी झाल्यानंतर सर्व जण निघाले. माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांच्यावर संतापले. शिवीगाळ करत अंगावर धावत जाऊन मारहाण केली.

Babajani Durrani
Ambadas Danve On Budget News : स्वार्थ हाच संकल्प अन् सरकारचा ध्यास, महाराष्ट्रावर कर्जाचे ओझे वाढवले!

माजी आमदार दुर्रानी यांच्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पाथरीत पसरली. त्यामुळे पाथरीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाथरी नगरपरिषदेच्या बाहेर तत्काळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच जमावाला पोलिसांनी बळाचा वापरून करून पांगवले.

या प्रकरणी आलोक चौधरी यांनी पाथरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बाबाजानी दुर्रानी आणि इतर तिघे, असे एकुण 4 जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाजानी दुर्रानी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com