Maratha Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Beed News : बीड जाळपोळ -दगडफेक प्रकरणात पोलिसांची धरपकड सुरुच;अब तक @307

Maratha Reservation : या प्रकरणी माजलगावसह बीडला शहर पोलिस ठाणे, शिवाजीनगर पोलिस ठाणे व बीड ग्रामीण पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे नोंद आहेत.

Datta Deshmukh

Beed : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे.त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकांमुळे सरकारचेही धाबे दणाणले आहे.मात्र, बीडमधील जाळपोळ प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे,या मागणीसाठी ३० ऑक्टोबरला बीड व माजलगावमध्ये झालेल्या जाळपोळ व दगडफेक प्रकरणातील संशयितांची पोलिसांकडून धरपकड सुरुच आहे.आतापर्यंत पोलिसांनी 307 संशयितांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांत जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे 307 हे कलम देखील लावले आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी माजलगावला आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरी व नंतर शहरातील धैर्यशील सोळंके यांचे घर, सनराईज हॉटेल, नगर रोडवरील क्षीरसागरांचे घर, शिवसेना कार्यालय, राष्ट्रवादी भवन आदी ठिकाणी जाळपोळ घडली. तर, शुभम ज्वेलर्स, पंडितांचे घर, भाजप कार्यालय, शिवसेना कार्यालय, दुचाकी शोरुम, रिलायन्स ट्रेंड यासह इतर ठिकाणी दगफडेक करुन नुकसान झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी माजलगावसह बीडला (Beed) शहर पोलिस ठाणे, शिवाजीनगर पोलिस ठाणे व बीड ग्रामीण पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे नोंद आहेत. यात जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या कलमाचाही समावेश आहे. पोलिसांनी उपलब्ध फुटेजच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटविली आहे.

या सर्व प्रकरणांत 90 संशयित अगदीच आक्रमक होते. यातल्या 85 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, उर्वरित प्रमुखांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत एकूण 307 संशितांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT