Gopinath Munde-Pankaja Munde-Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Gopinath Munde News : ‘गोपीनाथ मुंडे आज असते, तर 'त्या' गोष्ट घडल्याच नसत्या’

पंडीतअण्णा मुंडे मोठे असूनही गोपीनाथ मुंडे यांचे बूट आणि चप्पल उलचण्याचा कमीपणा कधीही दाखवला नाही.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गोपीनाथ मुंडे यांना जाऊन आज नऊ वर्षे झाली आहेत. या नऊ वर्षांत अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत, कदाचित गोपीनाथ मुंडे असते तर त्या घडल्या नसत्या. मी मुंडेसाहेबांसोबत सावलीसारखा राहिलो आहे. कॉलेज जीवनापासून २००९ ची त्यांची लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक इथपर्यंत एक एक क्षण मला त्यांच्या राजकीय जीवनातील आठवतो, अशी आठवण धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. (Politics led to conflict in our home : Dhananjay Munde's confession)

भारतीय जनता पक्षाचे नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज (ता. ३ मे) नववा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, मला निवडणुकीच्या राजकारणात आणण्याचा निर्णय आमच्या घरात झाला, त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे १९७८ मध्ये ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आले, त्याच गटातून मी उभं राहावं, अशी त्यांची इच्छा होती. त्याचवेळी माझे वडिल पंडीतअण्णा मुंडे यांची अशी इच्छा होती की, घरचा मतदारसंघ असताना मी दुसऱ्या तालुक्यात जाऊन निवडणूक का लढवावी. पण, शेवटी मी गोपीनाथ मुंडे यांचं ऐकलं आणि त्या मतदारसंघात अटीतटीची निवडणूक झाली. मी माझा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जाऊन अवघ्या तीनशे मतांनी निवडून आलो. तेथून माझ्या निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात झाली.

अनेक संघटनांमध्ये मुंडेसाहेबांच्या सान्निध्यात कामे करता आली. भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष, पार्लमेंटरी बोर्डाचा सदस्य होतो. पण, माझा पुतण्या आहे म्हणून त्याला पुढे आणलं पाहिजे, अशी वागणूक त्यांनी कधीही आम्हाला दिली नाही. शेवटी मी १९९६ मध्ये भाजप विद्यार्थी आघाडीचा अध्यक्ष झालो. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनंतर २००७ मध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो, असेही धनंजय यांनी नमूद केले.

आमच्या कुटुंबीयांचा, वडिलधाऱ्यांचा जो आधार होता, तो गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंडीतअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर गेला. आमचे दुसरे चुलतेही वारले. आपला लहान भाऊ मोठा होऊ शकतो, हे स्वप्न पंडीतअण्णा मुंडे यांनी पाहिले. पंडीतअण्णा मुंडे मोठे असूनही गोपीनाथ मुंडे यांचे बूट आणि चप्पल उलचण्याचा कमीपणा कधीही दाखवला नाही. एवढा कर्तृत्ववान आपला भाऊ आहे, हे कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं. पण त्यांचं अपघाती निधन आम्हा कुटुंबीयांच्या जिव्हारी लागलं.

आज आमच्या कुटुंबांत संवाद सुरू आहे. पण, आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. सर्वसामान्यांसाठी संषर्घ करण्याची आमच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी निर्माण केली. ही गोष्ट खरी आहे की आमच्या कुटुंबात राजकरणामुळे संषर्घ झाला. संघर्षानंतर जी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतरच्या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. मुंडे यांचे २०१४ मध्ये निधन झाले, त्यानंतर अण्णा कॉटवरून उठलेच नाहीत. पाच वेळा त्यांना एअर लिफ्ट करावं लागलं. अण्णांचा सर्वाधिक जीव गोपीनाथ मुंडे यांच्यावर होता. याचा क्षणोक्षणी अनुभव मी घेतलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT