Beed Murder Case News Sarkarnama
मराठवाडा

EX Sarpanch Murder Case : माजी सरंपच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला!

Postmortem report in Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर आणि डोळ्यांवर गंभीर प्रहार करण्यात आला. त्यामुळे शरीरातील आतल्या भागात रक्त साकाळून त्यांच्या मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे.

Jagdish Pansare

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना गॅस पाइप किंवा आतमध्ये मोठी तार असलेल्या जाड वायरची पिळवटी करून मारहाण करण्यात आली. साधारण एक ते दीड तास सलग मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही डोळ्यांसह डोके, पोट, छातीवर मारहाणीचे गंभीर व्रण उत्तरीय तपासणीत आढळून आले.

मंगळवारी (ता.10) रात्री केज उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय चमूने ही उत्तरीय तपासणी केली. संवेदनशील प्रकरण असल्याने खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात केज रुग्णालयात थांबून होते. (Beed News) देशमुख यांचे सोमवारी (ता. 9) तीन वाजता टाकळी जवळील टोलनाक्यावरून अपहरण करण्यात आले.

त्यानंतर त्यांना एका वाहनात नेऊन मारहाण झाली. पुन्हा तीन तासांनी त्यांचा मृतदेह दैठणाजवळ टाकण्यात आला. (Crime) त्यांच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या. दरम्यान, मुख्य आरोपीची अटक व पाठराखण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईक व मस्साजोग ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.

अखेर मंगळवारी रात्री घटनेच्या 26 तासांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करण्यात आली. यात संतोष देशमुख यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर आणि डोळ्यांवर गंभीर प्रहार करण्यात आला. त्यामुळे शरीरातील आतल्या भागात रक्त साकाळून त्यांच्या मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे.

संतोष देशमुख यांचे वाहन आडवून पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण करूनच अपहरण केले. वाहनातही त्यांना जबर मारहाण करण्यात आली. नंतर एखाद्या ठिकाणी वाहन थांबवून आरोपींनी मारहाण केल्याचा पोलिसांचा कयास आहे.

त्यादृष्टीने आरोपींची चौकशी सुरू असून आज पुण्याजवळील रांजणागाव येथून या प्रकरणातील तिसऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. या खून प्रकणावरुन बीड व राज्यातील राजकारणही तापले आहे. मुख्य आरोपीला बेड्या ठोका, प्रकरणाची एसआयटी, सीआयडीकडून चौकशी करा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT