Loksabha Election 2024 : 'वंचित' काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. 'वंचित'ने कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर काँग्रेसला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले आहे. 'वंचित' नांदेडच्या जागेवर काँग्रेसला पाठींबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेस ज्या जागांवर पाठींबा मागेल त्या जागांवर पाठींबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकारांनी (Prakash Ambedkar) आधी जाहीर केले होते. नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला 'वंचित' पाठिंबा देईल की नाही या विषयी आंबेडकर म्हणाले, काँग्रेस मधील वरिष्ठ या विषयी काही मागणी करत नाही तो पर्यंत नांदेडच्या उमेदवाराला वंचितचा पाठिंबा राहणार नाही, त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेते याकडे नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी (Nanded Lok Sabha constituency) वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने व काँग्रेस पक्षाने मतदारांची दिशाभूल करू नये. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी काँग्रेस उमेदवाराला कुठलाही पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिला नाही असे सांगितले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली स्थिती असून नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेला राजकीय बदल लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी इतर कुठल्याही पक्षापेक्षा सरस आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार द्यावा असा ठराव पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीकडे पाठवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.