Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

Rajya Sabha Election 2024 : पंकजा मुंडेंनी दुःख बोलून दाखवले; राज्यसभेसाठी नाव चर्चेला येण्याचे कारणही सांगितले...

Datta Deshmukh

Beed : भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी अजून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. मात्र, राज्यसभा उमेदवारीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून राज्यसभेवर पंकजा यांना पाठवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे, पण दरवेळी राज्यसभा-विधान परिषद निवडणुकीसाठी आपले नाव का चर्चेत येते, याचे उत्तर खुद्द पंकजा मुंडे यांनीच देऊन टाकले. (Pankaja Munde News) Rajya Sabha Election 2024

'विधान परिषद, राज्यसभा निवडणूक लागली की आपले नाव नेहमी चर्चेत येते. त्यामुळे यात मला काही नावीन्य वाटत नाही. आपण अनेक दिवसांपासून पदाच्या प्रतीक्षेत असल्याचे लोकांना, माध्यमांना वाटते. अनेकजण राज्यसभा, विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले. त्या हिशेबाने आपले नाव येते,' असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

' आपले नाव येत असले तरी लोकांना आपल्याला कुठे पाहायला आवडेल हे महत्त्वाचे आहे. आता तीन पक्षांचे सरकार असल्याने साहजिकच आपल्याला मतदारसंघ (constituency) राहिला नाही. त्यामुळे आपले नाव चर्चेत येते. त्याला आपण काय करणार, असेही म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारसंघ राहिला नसल्याचे दु:खदेखील बोलून दाखवले.

भाजपच्या गाव चलो अभियानामध्ये पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला होता. शिरूर कासार तालुक्यातील पौंडुळ ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यापूर्वी त्यांनी श्री क्षेत्र नारायणगडावर जाऊन त्यांनी नगद नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच, गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्याशीही संवाद साधला.

आज होणार नावांची घोषणा?

विविध राज्यांच्या विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर तब्बल 56 जागांसाठी विविध राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये सहा जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी मिळणार याची याची चर्चा होत असताना आज (सोमवारी) भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT