Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve :आम्ही कायम इलेक्शन मोड वर, पहिली जिकंलो की दुसऱ्या निवडणुकीची तयारी..

Marathwada BJP : रावसाहब दानवे सहाव्यांदा खासदार होण्याच्या तयारीत

Jagdish Pansare

Marathwada News : जेव्हा एखादी निवडणूक आम्ही जिंकतो, त्याचवेळी आम्ही दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागतो, आम्ही कायम इलेक्शन मोडवर असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहब दानवे यांनी संगितले. लोकसभा निवडणुक अवघ्या चार महिन्यांवर आलेली असतांना दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

बैठका, बुथ कमिट्यांचा आढावा, मतदार याद्या सूसुत्रीकरण अशा माध्यमातून दानवे यांनी निवडणुकीची सगळी सुत्र हाती घेतली आहेत. प्रत्येक मतदार यादीवर कटाक्ष टाकत पदाधिकारी, भाजप कार्यकर्त्यांना सचूना करतांना दानवे दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील तयारीला वेग दिला आहे. सहाव्यांदा उमेदवारी मिळणार का? यावर आमची पार्लामेंट्री कमिटी निर्णय घेईल, असे सांगत दानवे पक्षशिस्त ही पाळतांना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु त्यांची तयारी पाहता जालन्यातून तेच उमेदवार असणार हे निश्चित आहे. आता महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात कोण मैदानात असेल यावर जालना लोकसभेची लढाई कशी होणार हे अवलंबून असणार आहे. दोन वेळा आमदार आणि सलग पाचवेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचे पारडे आज घडीला जड आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले असून जालन्यातून दानवेंना टक्कर देऊ शकेल अशा तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे.

दरम्यान, दानवे यांनी जालना जिल्ह्यात निवडणूक तयारीला वेग देत सगळ्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदारांना कामाला लावले आहे. नुकतीच जालन्यात रावसाहबे दानवे यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादी सुसूत्रीकरण कार्यक्रमा अंतर्गत "मतदार चेतना महाभियान" टप्पा- २ राबविण्यात आले. यावेळी प्रत्येक बुथवरील पाच प्रमुख कार्यकर्त्यांशी दानवे यांनी चर्चा केली. मतदार यादीतील त्रुटी दुर केल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, आमदार नारायण कुचे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे यांच्यासह बूथ प्रमुख, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जातांना दानवे मतदारांसमोर आपल्या कामाचे प्रगतीपुस्तक घेऊन जाणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी मराठवाड्यात केलेल्या रेल्वे विकासकामांची यादी, जालना लोकसभा मतदारसंघात मंजूर करून आणलेले प्रकल्प, निधी, शहरासाठीची पाणीपुरवठा योजना, केंद्रातील शैक्षणिक संस्था यासह इतर कामांची जंत्री असणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा तब्बल 3 लाख 32 हजार 815 मतांनी पराभव केला होता.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT