Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचरल असतं रोहित अजून बच्चा आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही, असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. तर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचा सिनिअर सिटीजन असा उल्लेख केल आहे.
खासदार सुप्रिया सुळे आज रविवारी पुणे दौऱ्यवर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे म्हणाल्या, पालिका निवडणुका होत नसल्याने सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे जनतेच्या पैशाचा चुराडा होतो आहे . त्यामुळे त्याचा मी निषेध करते. शासन आपल्या दारी कार्यक्रमावर किती खर्च झाला याचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमांतून सरकार स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका बेजबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसासह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारणं देखील चुकीचे आहे. राज्यातल्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जितक्या कॉन्फिडंटली मी राज्यात फिरते तशी दुसऱ्या राज्यात फिरत नाही मला राज्य पोलीस दलावर विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. जी घटना पुण्यात झाली त्याचा मी निषेध करते असेही त्या म्हणाल्या. या सगळ्या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहिणार आहे. तुम्ही जर कारवाई करणार नसाल तर कसं चालेल. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेता तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. आपण आशा घटना का सहन करायच्या असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.
यावेळी रोहित पवार यांच्या बाबत अजित पवार यांनी केलेल्या विधाना बाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणल्या, दादा वयाने मोठे आहेत. ते रोहित पवार यांचे काका आहेत. त्यामुळे मी अथवा रोहित पवार हे मनाला लावून घेणार नाही. दादांचे ६५ आहे तर रोहित पवारांचे ४० वय आहे. त्यामुळे दादा सिनियर सिटीजन आहेत असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला हणाला.
(Edited by Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.