छत्रपती संभाजीनगर : राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आले आहे. आमच्या तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे, कोणत्याही खात्यासाठी, मंत्रीपदासाठी आमच्यात रस्सीखेच नाही. रस्सीखेच फक्त चॅनल आणि वर्तमान पत्रांमध्येच दिसते आहे असे सांगत भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 'ऑल इज वेल' असल्याचा दावा केला.
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी माध्यमाशी बोलतांना संभाव्य मंत्रीमंडळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल आपले स्पष्ट मत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना प्रशासन आणि सरकार चालवण्याचा आधीची पाच आणि आताची अडीच वर्ष असा प्रदीर्घ अनुभव आहे.
त्यामुळे महायुती सरकार आणि त्यामधील घटक पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. (BJP) हे सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक अशा सगळ्याच क्षेत्रासाठी भरीव योजना येत्या काळात राबवणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे.
हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळ विस्तारही होईल, असे दानवे यांनी सांगितले. महायुती सरकारमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला किती मंत्री पदं मिळतील, या प्रश्नावर तो मुख्यमंत्र्यांच्या अधिकार आहे, ते ठरवतील असे सांगितले.
महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपल्या नावाची चर्चा आहे, असे विचारले असता आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगले काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वातच भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची चर्चा अजिबात नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.