Raosaheb Danve, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

BJP Vs Shivsena : ठाकरे बंधूंची टीका दानवेंच्या जिव्हारी : CM फडणवीसांसमोरच दाखवली उद्धव ठाकरेंना जागा

Raosaheb Danve News : मागच्या दाराने आले अन् अडीच वर्षात खुर्चीवरून खाली उतरले, मग मी मोठा की उद्धव ठाकरे? रावसाहेब दानवेंनी सांगितले भाजपमधील स्थान!

Jagdish Pansare

Jalna News : भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर उद्धव आणि राज ठाकरे यांनी केलेली टीका त्यांच्या जिव्हारी लागली. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मुंबई महापालिका ही शेवटची निवडणूक ठरेल, त्यानंतर हा पक्ष अस्तित्वात राहणार नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांना त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही, असा तर राज ठाकरे यांनी उत्तर देवांना द्यायचे असते, दानवेंना नाही असा पलटवार केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित जालन्यात पार पडलेल्या आजच्या सभेत रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा 40 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत भाजपने आपल्याला काय काय? दिले हे ठणकावून सांगत मी मोठा की उद्धव ठाकरे? असा सवाल केला. उद्धव ठाकरे हे आमच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर टीका करतांना पैशाचा वापर भाजपने केला असा आरोप करतात. मग तुम्ही विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आला होतात, तेव्हा किती पैसे दिले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अडीच वर्ष भाजपशी दगाबाजी करून तुम्ही मुख्यमंत्री झाला होता, पण अडीच वर्षात तुम्हाला खाली उतरावे लागले. मला पक्षात कोणी विचारत नाही, अशी टीका तुम्ही केली होती, पण मला पक्षाने गावचा सरपंच, पंचायत समितीचा सभापती, दोनवेळा आमदार, पाचवेळा खासदार, दोनदा केंद्रात मंत्री, राज्याचा भाजपचा अध्यक्ष केले. मग सांगा रावसाहेब दानवे मोठा की उद्धव ठाकरे? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला.

जालन्याचे काय 'कल्याण' केले?

लोकसभा निवडणुकीत जालन्यात माझा पराभव झाला, लोकांनी कल्याणला निवडून दिले. दीड वर्षात जालन्याचे काय कल्याण केले हे त्यांनाच विचारा, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना लगावला.

भाजपचे उमेदवार निवडून आले की हे मतचोरीचा आरोप करतात, ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप करतात. पण कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आली तेव्हा मतचोरी नव्हती, ईव्हीएमचा घोळ नव्हता? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले. तेव्हा कोणी मतचोरी, ईव्हीएमवर बोलले नाही. मग आम्ही जिंकल्यावर विरोधक यावर का बोलत नाहीत? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT