Danve-Save- Shirsat in DPC Meeting In Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : संकटात सापडलेल्या शिरसाट यांनी गोरगरिबांसाठी घेतला मोठा निर्णय! सीटी स्कॅन, एमआरआयसाठी निम्मी रक्कम डीपीसीतून

Guardian Minister Sanjay Shirsat declares that 50% of the cost for CT and MRI scans of poor citizens will be covered through the District Planning Committee (DPC). : सीटीस्कॅन आणि एमआरआय तपासण्यांचे दर निम्मे करुन रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णय घेतला, याबद्दल समितीने पालकमंत्र्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी) सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी रुग्णांना जे शुल्क आकारले जाते त्यातील 50 टक्के शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येईल. त्यामुळे रुग्णांना केवळ 50 टक्केच शुल्क भरावे लागेल, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठकीत शिरसाट यांनी ही घोषणा केली. 2025-26 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता 735 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करीता 104 कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 10 कोटी 46 लक्ष रुपये असा एकूण 849 कोटी रुपयांचा नियतव्यय बैठकीत मंजूर करण्यात आला. (Chhatrapati Sambhajinagar) तर 3 कोटी 14 लक्ष रुपये निधी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना करीता प्राप्त झाला आहे.

सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वार कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला या घटनेची चौकशी करण्यात येईल. दरम्यान मृत महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने मंजूर केली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त वीज अटकाव यंत्रे बसवावीत. (Sanjay Shirsat) जेणेकरुन वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांना थांबविता येईल. त्यासाठीही जिल्हा नियोजन समिती निधी देईल. जायकवाडी प्रकल्पासंदर्भात 'मेरी'या संस्थेने दिलेल्या अहवालासंदर्भात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतील व आपले म्हणणे मांडतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

महावितरणने ट्रानस्फार्मर बसवून देण्याचे काम पूर्ण करावे. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय साठी निम्मे शुल्क जिल्हा नियोजन समिती देईल. तसेच जिल्ह्यात दुरावस्था झालेल्या स्मशानभुमीची दुरुस्ती करता यावी यासाठी प्रत्येक आमदारांस त्यांच्या कार्यक्षेत्रात कामे करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जासंदर्भात येत्या सोमवारी बँकांची आढावा बैठक घ्यावी, असे निर्देशही शिरसाट यांनी बैठकीत दिले.

खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या निर्मितीची योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच त्याठिकाणी अधिकाधिक सौर उर्जेचा वापर करण्याचे नियोजन आहे. तसेच वेरुळ येथील मालोजीराजे गढी येथेही पर्यटकांची गर्दी होत आहे. शहरातील वंदे मातरम सभागृह हे देखभालीसाठी महापालिकेकडे देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड करावी. त्याचे वेळापत्रक तयार करुन लोकप्रतिनिधींना द्यावे, जेणेकरुन त्यांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल, असे पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री शिरसाट यांनी घाटी रुग्णालयातील सीटीस्कॅन आणि एमआरआय तपासण्यांचे दर निम्मे करुन रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णय घेतला, याबद्दल समितीने पालकमंत्र्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवलेले लोकाभिमुख उपक्रमांबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर एमआयडीसीतील भुखंड, सरकारी जमीन, बेकायदेशीर मालमत्ता खरेदी प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर झालेल्या आजच्या डीपीसी बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT