Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, स्कॉर्पिओ वाहनाच्या फॉरेन्सिक रिपोर्टमुळे फास आवळला, धक्कादायक गोष्टी उघड

Santosh Deshmukh News : सध्या या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू आहे. त्यानंतर आता हत्येचे पुरावे सापडलेल्या गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये एकूण 19 पुरावे आढळून आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येच्या निषेधार्थ सर्वत्र मोर्चे काढण्यात आले. सध्या याप्रकरणी सध्या सीआयडी आणि एसआयटीची चौकशी सुरु असून त्यामधून या प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांचे अपहरण करत हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यातच आता सुदर्शन घुलेच्या जबाबानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून (Police) केला जात होता. सध्या या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू आहे. त्यानंतर आता हत्येचे पुरावे सापडलेल्या गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये एकूण 19 पुरावे आढळून आले आहेत.

विविध तपास यंत्रणांकडून संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. यात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये अनेक पुरावे सापडले आहेत. त्यातच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. या वाहनामधून तब्बल 19 पुरावे आढळून आले आहेत. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार स्कॉर्पिओ कारच्या काचांवर असलेले फिंगरप्रिंट्स हे आरोपी सुधीर सांगळेचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता येत्या काळात तपास कामाला गती येणार आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी काळ्या रंगाची स्कार्पिओ कार वापरण्यात आली होती. तब्बल 19 पुरावे काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये सापडले असून वाहनावरील ठसे आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. या कारच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर 2 ठसे आढळून आले आहेत. हे फिंगरप्रिंट सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल मिळाला आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी सुदर्शन घुले याच्या मालकीची आहे.

या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर जबाबात संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली असल्याची कबुली दिली. आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत संरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते. त्यादिवशी मित्राचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आम्हाला मारहाण केली. त्यानंतर देशमुखांनी आमच्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आम्हाला चॅलेंज दिले होते. या गोष्टीचा आम्हाला राग आला होता. त्यामुळे अपहरण करून देशमुख यांची हत्या केली अशी कबुली सुदर्शन घुले यांनी दिली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT