Walmik Karad  Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : 'वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हाच लागू होऊ शकत नाही कारण....', वकिलाने न्यायालयात काय सांगितले?

Lawyer Claims Murder Charge Not Applicable for Walmik Karad : खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज (बुधवारी) त्याला बीडमधील कोर्टात हजर करण्यात आले.

Roshan More

Walmik Karad News : खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज (बुधवारी) त्याला बीडमधील कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी एसआयटीच्या वकिलाकडून युक्तीवाद करत दहा दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. वाल्मिक कराडच्या वकिलाने युक्तीवाद करताना वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हाच लागू होत नसल्याचे सांगितले.

वाल्मिक कराडच्या वकिलाने युक्तीवाद करताना म्हटले की, कुठल्याही आरोपीने नाव घेतले नसताना मकोका लावणे चुकीचे आहे. नाव घेतले नसताना त्यांच्यावर हत्येचा गुन्हा देखील लागू होत नाही.

कराड यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांना केलेली अटक ही देखील बेकायदेशीर असल्याचे वकिलाने आपल्या युक्तीवादामध्ये म्हटले आहे.

एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे, आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? याचे पुरावे देखील नाहीत, असा युक्तिवाद वकिलाने केला.

हत्येच्या दिवशी आरोपींशी संपर्क

सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड हे आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. तसेच हत्येच्या दिवशी फोनद्वारे आरोपींनी कराड यांच्याशी संपर्क साधल्याचे म्हटले आहे.

सात दिवसांची कोठडी

वाल्मिक कराड यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सुनावणीनंतर कोर्टाच्या बाहेर कराड यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT