Walmik Karad : वाल्मिक कराडला फर्ग्युसन जवळ ऑफिस खरेदीसाठी मदत करणारी 'ती' महिला कोण?

Walmik Karad Property Update : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या कांडने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. वाल्मिक कराड याच्या भोवती चौकशीचा फास आवळला जात असतानाच त्याच्या समर्थकांनी विरोध सुरू केला आहे.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याकडे गडगंज संपत्ती असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनीच अनेकदा आवाज उठवला आहे. तर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून सरकारला घेरताना कराडची चौकशी ईडी का करत नाही? असा सवाल केला आहे. तर कराड याची पुण्यात संपत्ती असल्याचे दावे केले जात आहेत.

दरम्यान पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यातील एक संपत्ती फर्ग्युसन रस्त्यावर आणि दुसरी वाकड येथे आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अपहरण करून करण्यात आली होती. तर आर्थिक घडामोडीतून झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी खंडणी मागणाऱ्या कराड यांच्या साथिदारांना विरोध केल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर आता सर्व आरोप आणि वाल्मिक कराड SIT सह सीबीआयच्या ताब्यात असून नव नवे खुलासे समोर येत आहेत.

Walmik Karad
Walmik Karad Wife Statement : निवडून यायला मोठं व्हायला अण्णा पाहिजे, आता अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का?

वाकडचा 4BHK फ्लॅट सील

आता कराड याच्या पुण्यातील मालमत्तेचे प्रकरण उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली यांच्या नावे मालमत्ता आहे. येथे 4BHK फ्लॅटची मिळकत असून ता आता प्रशासनाने सील केली आहे. तर ही कारवाई कर न भरल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान कराडला पुण्यातील प्राइम लोकेशन असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर ऑफिस घेतल्याचा दावा देखील समोर आला आहे. पण या ठिकाणी मालमत्ता घेण्यासाठी एका महिलेनं मदत केल्याचे देखील समोर आले आहे. पण आता ही महिला कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Walmik Karad
Walmik Karad Video : पोलिस व्हॅनमध्ये बसताना वाल्मिक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एका इमारतीचे काम सुरू असून येथे कराड याने दोन ऑफिस घेतले आहेत, असा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होता. याबाबत त्यांनी पैठणच्या सभेत दावा केला होता. तर ही गुंतवणूक एका महिलेच्या नावावर केल्याचेहा आरोप धस यांनी केला होता. यानंतर आता खरी माहिती समोर आली असून त्या महिलेचे नाव उघड झाले आहे.

वाल्मिक कराड याची गुंतवणूक आपल्या नावे करणाऱ्या महिलेचे नाव ज्योती जाधव आहे. वाल्मिक कराड याने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने दोन ऑफिसेस खरेदी केली असून याचे कागदपत्रे समोर आली आहेत. ज्योती जाधव या महिलेने फर्ग्युसन रस्त्यावरील कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीत काम सुरू असतानाच गुंतवणूक केली आहे. येथे ऑफिस नंबर 610 सी अपार्टमेंट आहे. जो 45.71 चौ. मी कार्पेट क्षेत्र आहे. याला बाल्कनी आणि पार्किंगची जागा आहे.

Walmik Karad
Walmik Karad Custody : मोठी बातमी! वाल्मिक कराड घुले अन् चाटेच्या संपर्कात? देशमुखांना दिली होती धमकी? सात दिवसांची पोलिस कोठडी

तर दुसरी मालमत्ता ही 611बी या ऑफिसचा असून तो 54.51चौसर मिटर आहे. यालाही बाल्कनी आणि खाली पार्किंग आहे. तर या मालमत्तेसाठी २५ कोटींची उलाढाल झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र ज्योती जाधव या महिलेचा वाल्मिक कराड याच्याशी संबंध काय? याचे उत्तर अद्याप उघड झाले नसून याचा तपास ईडीकडून तपास होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com