Walmik Karad Wife Statement : निवडून यायला मोठं व्हायला अण्णा पाहिजे, आता अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का?

Valmik Karad's wife criticizes Dhananjay Munde without naming him : परळी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. काल वाल्मीक कराड याच्या मातोश्री पारूबाई आणि पत्नी यांच्यासह शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले होते.
Walmik Karad Wife Statment News
Walmik Karad Wife Statment NewsSarkarnama
Published on
Updated on

बीड :दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर बीड (Beed News) जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. परळीत वाल्मीक कराड याची आई पारूबाई आणि पत्नी आंदोलनाला बसल्या आहेत. वाल्मीक कराड याच्या विरोधात फास आवळला जात असताना त्याच्या पत्नीचा संयम सुटत असल्याचे आज दिसून आले.

परळीत माध्यमांशी बोलताना वाल्मीक कराडच्या पत्नीने आज अप्रत्यक्षपणे मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांच्यावर राग व्यक्त केल्याच्या दिसून आले. 'तुम्हाला निवडून यायला मोठं, व्हायला अण्णा पाहिजे, आता त्याच अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का? तुम्ही नेहमी येत होतात आमच्या घरी,ते पण अनेकदा आले मग आज राजकारणासाठी अण्णाचा बळी तुम्ही का द्यायला निघालात! तुम्हाला काय राजकारण करायचे ते मुंबईत बसून करा' अशा शब्दात कराड याच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Walmik Karad Wife Statment News
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'एसआयटी'चे प्रमुख बसवराज तेलींचं धस 'कनेक्शन'?

त्यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे. वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर एसआयटीने त्याचा ताबा घेतला आहे. बीड कारागृहात असलेल्या कराड याची प्रकृती बिघडल्याने त्याची पत्नी आणि आई पारूबाई यांनी वाल्मीक कराडला अडकवले जात आहे, असा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. परळीत वाल्मीक कराड यांच्या पत्नीने आज थेट भाष्य करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

Walmik Karad Wife Statment News
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना एक अन् बाकीच्यांना दुसरा न्याय का? राऊतांनी मोदींच्या दौऱ्याशी जोडले कनेक्शन

'तुम्ही सगळे आधी माझ्या घरी खेट्या घालायचात ना, तुम्ही पण येत होतात ना! निवडून यायला तुम्हाला अण्णा लागत होता, मोठा व्हायला अण्णा लागत होता मग आता राजकारण करायला अण्णा नको. माझ्या माणसाचं मरण का करता? तुम्हाला काय राजकारण करायचं ते मुंबईत बसून करा' अशा शब्दात कराड याच्या पत्नीने आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली.

Walmik Karad Wife Statment News
Santosh Deshmukh Case : 'सीएम'च्या सूचनेनंतर यंत्रणा हलली; मोठी अपडेट घेऊन तपास अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला जाणार

परळी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. काल वाल्मीक कराड याच्या मातोश्री पारूबाई आणि पत्नी यांच्यासह शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले होते. वाल्मीक कराड यांचा राजकारणासाठी बळी दिला जात असल्याचा आरोप करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे आमदार सुरेश धस हे राजकारण करत असल्याचा आरोप कराड याची आई आणि पत्नीने माध्यमांशी बोलताना केला होता.

Walmik Karad Wife Statment News
Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या भावाने टोकाची भूमिका घेताच CID ने उचललं मोठं पाऊल, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत परळीत हे आंदोलन सुरू होते. मात्र वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर आंदोलकांचा संयम सुटत असल्याचे दिसून आले. आत्मदहनाचा प्रयत्न आणि टायर जाळत बसवर दगडफेकीच्या घटना काल घडल्या होत्या. आज वाल्मीक कराड यांच्या पत्नीने अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.काल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर कराड याच्या पत्नीने जातीयवाद करत असल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com