Santosh Deshmukh Murder Case 2 Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी 'SIT'ला मोठं यश; आरोपींचा प्लॅन फसला, 'ते' व्हिडीओ पुन्हा मिळवले

SIT Beed Crime Update : एसआयटीनं रिकव्हर केलेले व्हिडिओ आणि इतर पुरावे न्यायालयात हजर सादर केले आहेत.या व्हिडिओत आरोपी सरपंच संतोष देशमुख यांना मारत होते आणि त्याचा आनंद ते लुटत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आता महिना होत आहे.या प्रकरणात रोज नव्या घडामोडी सुरु आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच सरकारने नेमलेल्या SIT वरून सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळालं. एकीकडे आरोपींच्या अटकेला झालेल्या उशिरामुळे या घटनेतील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत असतानाच आता एसआयटीला मोठं यश मिळालं आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) बीडसह संपूर्ण राज्यच हादरलं आहे. यात दिवसागणिक तपासयंत्रणांवरील वाढत्या दबावामुळे सरकारची डोकेदुखीही वाढली आहे. यातच आता सीआयडी आणि एसआयटीनं तपासात वेग पकडला आहे. या प्रकरणातील बर्‍यापैकी आरोपींना अटक झाली असून अनेक धागेदोरे एसआयटी आणि सीआयडीच्या हाती लागले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. त्यात देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आपण पाहिल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.त्यांनी आरोपींनी हत्या करतानाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे.

पण तपासात हे पुरावे जर तपास यंत्रणांच्या हाती लागले तर अडचणी वाढतील, या हेतूने आरोपींनी ते व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट केले. त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाल्याचं बोललं जात होतं. पण आता एसआयटीनं ते व्हिडिओचा पुरावा रिकव्हर केला आहे. मोबाईलमधून डिलीट करण्यात आलेला डाटा परत मिळवल्यानं तपासाला आणखी वेग येणार आहे.

एसआयटीनं रिकव्हर केलेले व्हिडिओ आणि इतर पुरावे न्यायालयात हजर सादर केले आहेत.या व्हिडिओत आरोपी सरपंच संतोष देशमुख यांना मारत होते आणि त्याचा आनंद ते लुटत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींच्या फोनमध्ये असलेले व्हिडिओ आरोपींनी डिलीट केले होते.पण आता ते रिकव्हर करण्यात विशेष तपास पथकाला (एसआयटी)यश आले आहे.

एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यात 41 इंचचा गॅसचा पाईप,लोखंडी तारेचे 5 क्लास बसवलेली मूठ,काळ्या रंगाच्या करदोडा,देशमुख यांना मारताना वापरण्यात आलेला लाकडी दांडका, तलवारीसारखे हत्यार, लोखंडी रॉड आणि कोयता अशा अनेक पुराव्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT