Dhananjay Munde News : सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीनंतर अवघ्या काही तासांत मुंडे हे अजित पवारांना भेटण्यासाठी दाखल झाले. तब्बल सव्वातास मुंडे-पवार यांच्यामध्ये चर्चा झाली.
मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अजित पवारांच्या भेटीत काय घडलं? हे मुंडे यांनी स्वत:च सांगितले. ते म्हणाले, 'माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंबंधात काहीच चर्चा झाली नाही. नववर्षाच्या निमित्ताने अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो होतो.'
अजितदादांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. मंत्रिपद दिले आहे त्याबद्दल मी स्वतः त्यांना धन्यवाद देण्यासाठी गेलो होतो. राजीनाम्याबाबत त्यांच्यामध्ये काहीच चर्चा झाली नाही. माझ्या बाबतच्या बातम्या या केवळ मिडिया ट्रायल आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
राजीनाम्याच्या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही. हे स्पष्ट आणि इमानदारीने सांगतो आहे. माझ्यावर जे टीका करत आहेत त्यामध्ये महायुतीमधील भाजपमधील आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना प्रश्न विचारावेत. अधिवेशनात ज्या ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली होती त्याच पद्धतीने चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याच पद्धतीने चौकशी होत आहे.
चौकशी होऊ द्या सत्य बाहेर येईल. तपास यंत्रणा काम करेल . माझ्यावर आरोप होत असताना मी यावर बोलणे उचित नाही, असे देखील मुंडे म्हणाले.
मुंडे-पवार यांची भेट झाली. तब्बल सव्वातास मुंडे-पवार एकत्र होते मात्र, आपण केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेल्याने धनंजय मुंडेंनी सांगितल्यानंतर सुरेश धस म्हणाले, भेट का झाली ते सांगतात पण अंदर की बात वेगळीच असते. केवळ शुभेच्छा द्यायला येवढा वेळ, असे म्हणत धस यांनी मुंडेंना टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.