Dhananjay Deshmukh Beed Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Deshmukh News : पोस्ट नको, पत्रकार परिषद घेऊन सत्य सांग; धनंजय देशमुख यांचे वाल्मिक कराडच्या मुलाला आवाहन!

Santosh Deshmukh murder case News : वाल्मिक कराड यांचे जामीनावर सुटकेचे सगळे प्रयत्न फसले. बीडच्या विशेष न्यायालयापासून औरंगाबाद खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टानेही वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला.

Jagdish Pansare

Beed Political News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि नंतर निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सात आरोपी अटकेत आहेत. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड यांचे जामीनावर सुटकेचे सगळे प्रयत्न फसले. बीडच्या विशेष न्यायालयापासून औरंगाबाद खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टानेही वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला.

वडीलांची जेलमधून काही सुटका होत नाही, हे लक्षात आल्यानंतर आतापर्यंत शांत असलेल्या वाल्मिक कराड यांच्या मुलाचा संयम सुटू लागला आहे. सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शुक्रवारी सुशील कराड याने फेसबुकवर एक पोस्ट करत 'आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार' असे मोजक्या शब्दात भाष्य केले. यावरून बीडसह राज्यभरात पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे, दावे किंवा तथ्य समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुशील कराड हे सर्वांसमोर सर्व काही बोलणार म्हणजे नेमकं काय सांगणार? ते धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही भूमिका घेणार आहेत का? त्यांना काही शब्द, आश्वासन देण्यात आले होते आणि आता ते पूर्ण होत नसल्याने वाल्मिक कराड याचा मुलगा काही मोठे गौप्यस्फोट करणार आहे का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या पोस्ट संदर्भात भाष्य केले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा. कोणाच्या आश्रयाने ही हिंमत आली? कोणी आरोपींना ताकद दिली? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंजची भाषा केली जात आहे. बेल अर्जापासूनच आरोपीची हत्तीवरून मिरवणुक काढण्याची तयारी आणि तसे स्वप्न पाहिले जात होते, असा आरोप करत धनंजय देशमुख यांनी सुशील कराड याच्या पोस्टवर टिप्पणी केली.

आज माझ्या भावाची हत्या होऊन 14 महिन्याहून अधिकचा काळ लोटलाय. त्यामुळे इतका काळ लोटल्यानंतर फेसबुक पोस्ट टाकण्यापेक्षा समोर येऊन बोलले पाहिजे. पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगितले पाहिजे. कोणी हिंम्मत दिली, कोणी राजाश्रय दिलाय, लोकांचे खून करायला सांगितलंय, हे सांगितलं पाहिजे, असे आवाहनच देशमुख यांनी या पोस्टच्या अनुषंगाने केले आहे.

जामीन अर्ज दाखल केला तेव्हाच आरोपीची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तयारी दाखवली होती. आताही तशीच काहीशी त्यांची मनीषा असेल. पण तसं काही झालं नाही म्हणून आता ते मुख्यमंत्र्याना, उच्च न्यायालयाला आव्हान देतायत, अशी टीकाही धनंजय देशमुख यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT