BJP Politics : भाजप नगरसेवकांना बंडखोरी भोवणार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी उचलले मोठं पाऊल, भिवंडी प्रकरणाची गंभीर दखल

Ravindra Chavan BJP Bhiwandi : काँग्रेसच्या मदतीने भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौर झाले. आता या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोर सहा नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi News : भिवंडी महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यामुळे बंडखोर नारायण चौधरी हे काँग्रेसच्या मदतीने महापौर झाले आहेत तर काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहा बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना निलंबित का करू नये? अशी विचारणा केली आहे.

भिवंडी महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांचे 30 नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत मिळून देखील सत्ता स्थापन करता येत नव्हती. पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक होते. अखेर भाजपचे नगरसेवक नारायण चौधरी यांनी बंडखोरी केली. त्या बदल्यात काँग्रेसने त्यांना पाठींबा देत उपमहापौरपद आपल्याकडे घेतले आणि महापौरपदी चौधरी यांचा विजय झाला.

महापौर पदासाठी मतदान झाले तेव्हा भाजपच्या सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत चौधरी यांना पाठींबा दिल्याचे समोर आले. या बंडखोरांमुळे चौधरी महापौरपदी विराजमान झाले. या बंडखोरीची गंभीर दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून या बंडखोरांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Ravindra Chavan
Jalgaon Mahapalika News: सत्ताधारी भाजपवर आली आंदोलनाची वेळ; नव्या वादाला प्रारंभ

अपात्रतेची टांगती तलवार

बंडखोरांची संख्या पाहाता त्यांना सहज अपात्र ठरवले जाऊ शकते. पक्षांतरी बंदी कायदा तसेच व्हिपची अंमलबजावणी न केल्याने ते अपात्र ठरत आहेत. त्यामुळे या बंडखोरांचे टेन्शन वाढणार आहे. भाजपने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीनंतर ते अपात्रसंदर्भात कारवाई करू शकतात, अशी देखील चर्चा आहे.

Ravindra Chavan
MSC Bank Case : मोठी बातमी! शिखर बँक गैरव्यवहार आरोपांना पूर्णविराम; तपास बंद करण्यास न्यायालयाची मान्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com