Pune Congress News: जागा एक इच्छुक अनेक! मुंबई ते दिल्लीपर्यंत नेत्यांचे फोन अन् सेटिंग

PMC Nominated Corporator election: मागील निवडणुकीत काँग्रेसला 10 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यंदा मात्र काँग्रेसने 15 जागा जिंकल्या आहेत. आता या 15 जागांच्या जोरावर काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे.
PMC Nominated Corporator election
PMC Nominated Corporator electionSarkarnama
Published on
Updated on

Pune News: कुठलीही निवडणूक असो पदाधिकाऱ्यांची नेमणूक असो वा संघटनात्मक बदल अशी कोणतीही चर्चा सुरू होताच काँग्रेस मधील अनेक गट अचानकपणे ऍक्टिव्ह होतात आणि लॉबिंग सुरू करतात.पुण्यामधल्या काँग्रेसच्या राजकारणाचं जणू हे सूत्रच बनले आहे.

नुकत्याच महापालिका निवडणुकाझाल्या. मागील पंचवार्षिक निवडणुकीची तुलना केल्यास यंदा काँग्रेसचा परफॉर्मन्स काही प्रमाणात सुधारला असल्याचं आकड्यावरून दिसून येत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला 10 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यंदा मात्र काँग्रेसने 15 जागा जिंकल्या आहेत. आता या 15 जागांच्या जोरावर काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे.

याच एका जागेची फिल्डिंग लावण्यासाठी काँग्रेसमधील अनेक गट ऍक्टिव्ह झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपचे 7 राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 स्वीकृत नगरसेवक होणार आहे.

या नियुक्ती बाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व गटनेत्यांना पत्र पाठवून स्वीकृत नगरसेवकांची नावाचे पत्र द्यावे, अशी सूचना केली आहे. त्यानुसार 9 मार्चला ही नाव देणे बंधनकारक असणार आहे.

नियुक्तीचा मुहूर्त जवळ आल्याने अनेकांनी आपली ताकद वापरून आपल्याला आणि आपल्या गटातील व्यक्तीला हे स्वीकृत नगरसेवक पद मिळावं यासाठी ताकद लावली असल्याचे पाहायला मिळत आहेत. काँग्रेसच्या त्या 1 जागेसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत कॉल केले जात असून भेटीगाठी घेऊन आपल्या नावाचा खुट्टा आणखी बळकट करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्णय भूमिका ही पुण्याचे प्रभारी बंटी पाटील,प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची असणार आहे. याच नेत्यांकडे फिल्डिंग जोरदार सुरू आहे.

PMC Nominated Corporator election
HSC Paper Leak: मुख्याध्यापक, शिक्षकानेच फोडला 12वीचा पेपर; मोठं रॅकेट उघड

सध्या पुण्यातून स्वीकृत नगरसेवकांसाठी संजय बालगुडे, अविनाश बागवे, अजित दरेकर, नरुद्दीन सोमजी, सुनील शिंदे, वीरेंद्र किराड यांची नावं चर्चेत आहेत. 2012 च्या निवडणुकीनंतर संजय बालगुडे यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये देखील त्यांनी प्रयत्न केला मात्र पदाने हुलकावणी दिली.

सध्या सीनियरिटीच्या बळावर त्यांनी पुन्हा एकदा या पदावर ती दावा केला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर अविनाश बागवे यांचे नाव देखील स्वीकृत पदासाठी चर्चेत आहे.अवघ्या 50 मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर युवा आणि आक्रमक नेता सभागृह असावा म्हणून त्यांच्या देखील नावाची चर्चा सध्या या पदासाठी आहे. 2017 च्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक राहिलेले अजित दरेकर पुन्हा एकदा या पदासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

PMC Nominated Corporator election
Jalgaon Mahapalika News: सत्ताधारी भाजपवर आली आंदोलनाची वेळ; नव्या वादाला प्रारंभ

या सर्व नावासोबतच यंदाच्या निवडणुकीत शिवसैनिक कडून उमेदवारी मिळालेले नौद्दीन सोमजी हे देखील स्वीकृत साठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी यंदा शिवसेनेकडून उमेदवारी घेतली अर्ज देखील दाखल केला आणि नंतर काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्या नावासाठी एका गटांनी जोरदार ताकद लावली असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या प्रचंड स्पर्धेमध्ये कोणाची वर्णी स्वीकृत नगरसेवक पदी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com