Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याचे व एसआयटीची स्थापन करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. त्यातच आता बुधवारी या प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे.
दुसरीकडे या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता पुढे काय होणार कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कराडवर या पूर्वीच 15 गुन्हे दाखल आहेत.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून ९ डिझेबरला हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे तर तिघे जण अद्याप फरार आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात अद्याप वाल्मिक कराडला सहआरोपी करण्यात आलेले नाही. सीआयडीकडून आता वाल्मिकची चौकशी करण्यात येत आहे. देशमुख हत्या प्रकरणात कराड लिंक काय आहे का ? याचा तपास सुरु आहे. कराडला सीआयडीने पवनचक्की खंडणी प्रकरणात अटक केली आहे.
वाल्मिक हा संतोष देशमुख हत्येप्रकरणातला संशयित आहे. येत्या काळात वाल्मिकचे संतोष देशमुख प्रकरणातले कनेक्शन शोधून काढण्याचे सीआयडीसमोर (CID) आव्हान असणार आहे. संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड कुठं होता? याचा शोध येत्या काळात पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या प्रकरणी कराड यांची काय लिंक आहे का? याचा तपास सीआयडीकडून सुरु आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने पोलीस महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आली. त्यांच्या टीममध्ये दहा सर्वोकृष्ट अधिकारी दिल्याची माहिती आहे. सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केली. मात्र त्याला अजूनही संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी केलेले नाही.
सीआयडी आणि पोलीस त्याला सहआरोपी करतात का याकडं देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाल्मिक कराडवर यापूर्वी 15 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी वाल्मिकला पुन्हा अटक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पोलिसाकडून या प्रकरणात काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.