
Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याचे व एसआयटीची स्थापन करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. त्यातच आता बुधवारी या प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीआयडी (CID)अधिकाऱ्यांची संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी बुधवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. या प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटीही (SIT) स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, याची माहिती घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
सीआयडीकडून सध्या युद्धपातळीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या संबंधाच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे.
धनंजय देशमुख स्वतःहून सीआयडी कार्यालयात गेले होते. हत्या प्रकराणाचा तपास कुठपर्यंत आला आहे याबाबतची माहिती सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी जाणून घेतली. या तपास कामात मी सहकार्य करु शकतो ते करण्याची तयारी दर्शवली आहे. तपास चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास असलेल्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. त्यांनी एसआयटीची स्थापना झाली आहे हे आम्हाला समजले आहे. त्यातले कुठले अधिकारी आहेत, याची माहिती घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. त्यासोबतच गेल्या काही दिवसापासून सीआयडीमार्फत तपास सुरु आहे तो योग्य दिशेने सुरु असल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
एसआयटीच्या पथकात असणार 'या' अधिकाऱ्यांचा समावेश
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. तर तेली यांच्या नेतृत्वाखालील या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.