Beed Loksabha Sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha : बीड लोकसभेसाठी शरद पवारांकडून चाचपणी; 'या' दिग्गज नेत्यांसोबत खलबतं

Datta Deshmukh

Beed News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक घेऊन इच्छुकांशी स्वतंत्ररित्या संवाद साधला.आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यामध्ये बूथ कमिट्यांची स्थापना करण्याची सूचना पवार यांनी दिल्या.

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad),प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,प्रा.सुशिला मोराळे या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली. या इच्छुकांशी पवार यांनी संवाद साधताना गायकवाड यांनी संपर्क,निवडणूक व विजयाचा अनुभव विशद केला.

डॉ.काळे यांनी विद्यमान खासदारांचे अपयशाचा पाढा वाचून आगामी निवडणुकीत तरुण चेहरा देण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थी,तरुणांसाठीची आंदोलनांच्या माध्यमातून असलेला संपर्क सांगितला. आपण एकमेव पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादीत एकनिष्ठ असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. सध्या असलेल्या प्रत्येकाने विविध पक्ष बदलले आहेत. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिक पार पाडली. दुष्काळ,आरोग्य, संघटन आदींसाठी काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar), जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार सय्यद सलिम, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रा. सुशिला मोराळे, राम खाडे, बबन गित्ते, पूजा मोरे, रविकांत राठोड,नारायण डक आदी बैठकीला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील संघटना बांधणीसाठी प्रत्येक गावांची बूथ बांधणीच्या सूचना पवार यांनी दिल्या. तसेच आगामी निवडणुकीत पक्षासमोरील आव्हाने, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या उणे व दुणे बाजूंचीही माहिती घेतली. यानंतर बुथ बांधणीसाठी लागलीच संदीप क्षीरसागर यांनीही बैठक घेऊन नियोजन केले. (NCP)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT