Eknath Shinde Shiv Sena Supreme Court case Sarkarnama
मराठवाडा

Supreme Court hearing : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण शिंदे की ठाकरेंचा? सरन्यायाधीशांनी सांगितलेला 30 ऑक्टोबरचा मुहूर्त टळला; सुप्रीम कोर्टानं दिली आता नवी तारीख

Uddhav Thackeray versus Eknath Shinde News : गुरुवारी होणारी शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी टळली. आता पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार असून यावेळेस ध्रुव मेहता हे बाजू मांडणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

New Dehli News : सुप्रीम कोर्टात गेल्या महिनाभरापासून शिवसेना पक्ष, चिन्हावर सुनावणी सुरु आहे. गेल्या आठवडाभरात युक्तिवाद झाला नव्हता. त्यामुळे या आठवडाभरात सलग सुनावणी होणार होती. बुधवारी सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी संघटनात्मक रचनेतील निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस व्हीप, पक्षांतर्गत निवडणुकांवरून त्यांनी घेरले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र, गुरुवारी होणारी शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी टळली. आता पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार असून यावेळेस ध्रुव मेहता हे बाजू मांडणार आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी सुरु आहे. यापूर्वी बोलताना सरन्यायाधीशांनी 30 ऑक्टोबरपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागेल असे सांगितले होते. मात्र, हा मुहूर्त टळला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी नवी तारीख दिली आहे. गुरुवारी कोर्टात ध्रुव मेहता हे आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्णयावर युक्तिवाद करणार होते. मात्र, गुरुवारी कोर्टात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

सुरुवातीला उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिबबल यांनी बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वकिल नीरज कौल यांनी देखील जोरदार बाजू मांडली. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती. त्यामुळे आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टात गुरुवारी शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करणार होते. मात्र, आता या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT