Pravin Swami Sarkarnama
मराठवाडा

Pravin Swami B.Ed exam : अभिनंदन! ठाकरेंच्या शिलेदाराला परीक्षेत पडले 77.54% गुण...

Shiv Sena MLA Pravin Swami from Omerga Constituency Passes B.Ed Exam : आमदार प्रकाश स्वामी हे कोरेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढवली आहे.

Pradeep Pendhare

Osmanabad MLA education : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघातील जायंट किलर आमदार प्रवीण स्वामी बी.एड (बॅचलर आॅफ एज्युकेशन) परीक्षा 77.54% गुणांनी उत्तीर्ण झाले आहे.

राजकीय जीवनातील धावपळ न सोडता, मंत्रालयातील कामकाजात देखील अभ्यास करत, आमदार प्रवीण स्वामी यांनी हे यश मिळवलं आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदार संघाचे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी हे मुळचे शिक्षक आहेत. आमदार झाल्यानंतरही शिक्षणाची त्यांनी कास सोडलेली नाही. राजकीय जीवनातील धावपळ, लोकांचा गराडा, मंत्रालयातील कामकाज यातूनही वेळ काढत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला.

प्रवीण स्वामी यांनी नाशिकच्या (Nashik) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठावतीने मे महिन्यात घेण्यात आलेली 'बी.एड'ची परीक्षा दिली. आमदारकी मिळवल्यानंतर राजकीय कामकाज अधिकच वाढते. लोकांच्या गाठीभेटी, समस्या, मंत्रालयातील कामकाज, त्यातच राज्यातील बदलती राजकीय स्थिती, यातूनही आमदार प्रवीण स्वामी यांनी 'बी.एड'चा अभ्यास सुरूच ठेवला.

परीक्षा दिल्यानंतर आता तिचा निकाल आला आहे. प्रवीण स्वामी यांना 'बी.एड'ची परीक्षा 77.54% गुण मिळाले आहेत. आमदार प्रवीण स्वामी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे मतदार संघातून अभिनंदन होत आहे.

प्रवीण स्वामी 'जायंट किलर' आमदार

उरमगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळवत, प्रवीण स्वामी यांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करत सगळ्यांनाच धक्का दिला. या निवडणुकीनंतर प्रवीण स्वामी यांची महाराष्ट्रात जायंट किलर आमदार अशी झाली. प्रवीण स्वामी 96 हजार 206 मतांनी विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांना 92 हजार 241 मतं मिळाली. प्रवीण स्वामी यांनी ज्ञानराज चौगुले यांना 3 हजार 965 मतांनी पराभव केला आहे.

शिक्षक ते आमदार

शिक्षक ते आमदार, असा राजकीय प्रवास एका महिन्यातच पूर्ण केल्यानंतर आमदार प्रवीण स्वामी 'बी.एड'ची परीक्षा दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते धाराशीव इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर दिला. आमदार स्वामी हे कोरेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT