Marathwada Political News : शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल भाकीत केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत मिळत असल्यामुळे भविष्यात शिवसेनेला राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची साथ मिळणार नाही आणि त्यामुळे या पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का, अशी होईल असे भाष्य शिरसाट यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट ही एका पक्षातील नाही तर कुटुंबातील फूट होती, असा अजब दावाही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. शरद पवार आणि अजित पवार हे दोघे पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा आणि तसे संकेत मिळत आहेत. काका-पुतण्यांचे सूर पुन्हा जुळू लागल्याने आता महाविकास आघाडीचे काय होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उबाठाला डिवचले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. राष्ट्रवादीसोबत केलेली युती चुकीची होती हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे (Shivsena UBT) उबाठासोबत राष्ट्रवादी राहणार नाही आणि महाविकास आघाडीतील काँग्रेससोबतही त्यांचा कुठलाही संवाद गेल्या चार महिन्यापासून झालेला नाही. अशावेळी उबाठा गट आता एकटा पडण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, महाविकास आघाडीचा घाट घातला मात्र त्यांना आपल्या भूमिकेवर ठाम राहता आले नाही, असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास शरद पवार यांच्या रूपाने महायुतीला नवीन मित्र मिळणार का? यावर आम्हाला काय मिळणार याबाबत मी काही बोलू शकत नाही. मात्र त्या दोघांचे एकत्र येणे हे काहीतरी संकेत देत आहेत, असा सूचक इशाराही संजय शिरसाट यांनी दिला.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तरी उद्या या पक्षाचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न कायम असणार आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार? या पेक्षाही शिवसेना आणि भाजप यांची युती पक्की असल्याचा दावाही शिरसाट यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.