Ambadas Danve, Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Khaire vs Danve : महापालिकेसाठी स्वबळाचा नारा, पण नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला !

Leadership Split on Self-Reliance Approach for Local Body Elections : दानवेंकडून बांगलादेशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची आपल्याला माहिती देण्यात आली नव्हती. जिल्ह्यात अजूनही आपलीच क्रेझ आहे, मीच मोठा नेता असल्याचा खैरे यांचा तोरा कायम आहे.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ पैकी एकही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिकंता आली नाही.

महायुतीला लाडकी बहीण पावली असे म्हटले जात असले तरी जिल्ह्यातील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील मतभेद या पराभवाला जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. (Chandrakant Khaire) लोकसभा निवडणुकीत दानवेंनी आपले काम केले नाही, असा आरोप खैरे यांनी यापुर्वीच केला होता. विधानसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यासह मराठवाड्याची जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावर सोपवली होती.

त्यामुळे चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणुकीत फारसे सक्रीय दिसले नाही. दोन्ही नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची झाले होते. परिणामी पक्षाला मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले. मात्र यातून नेत्यांनी काही धडा घेतला असे दिसत नाही. (Ambadas Danve) दानवेंकडून बांगलादेशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची आपल्याला माहिती देण्यात आली नव्हती. जिल्ह्यात अजूनही आपलीच क्रेझ आहे, मीच मोठा नेता असल्याचा खैरे यांचा तोरा कायम आहे.

तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनीही आपला बाणा न सोडण्याचा पावित्रा घेतला आहे. खैरेंवर थेट टीका करण्याचे दानवे खुबीने टाळतात, मात्र कृतीतून आपण त्यांना नेते मानतच नाही हे दाखवून देतात. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दानवे यांनी स्वतंत्रपणे जिल्ह्यातील सर्व मतदार संघाचा आढावा घेतला. तर खैरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती.

यावेळी आधी तुम्ही एकत्र या, असा सूर पदाधिकाऱ्यांना काढला. यावर खैरेंनी फारसे स्वारस्य दाखवले नाही. एकूणच दोन्ही नेते एकत्र यायला तयार नाहीत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक स्वबळावर लढण्याची मात्र भाषा सुरू आहे. दानवे आणि खैरे या दोन्ही नेत्यांच्या बैठकांना स्वतंत्रपणे हजेरी लावावी लागत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते पुरते वैतागले आहेत.

सातत्याने पक्षाचे नुकसान होत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच यात आता लक्ष घालावे, असेही काही पदाधिकारी बोलताना दिसत आहेत. निवडणुकीत यश-अपयश या नंतर, आधी विरुद्ध दिशेला तोंड असलेल्या नेत्यांना एकत्र आणा, अशी मागणी आता स्थानिक पातळीवर होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT