Shivraj patil, Madhvarao Patil  Sarkarnama
मराठवाडा

Shivraj Patil Chakurkar : ...अन् मित्राच्या मुलीला सून म्हणून घरात आणलं: शिवराज पाटलांनी जपली राजकारणा पलीकडची मैत्री!

Political News : महाविद्यालयीन जीवनातील मित्रत्व कायम स्मरणात ठेवून मित्राच्या मुलीचा विवाह आपल्या मुलासोबत करून मैत्री निभावणारे शिवराज पाटील चाकूरकर यांनी उदगीरकरांवर खूप प्रेम केले.

सरकारनामा ब्युरो

युवराज धोतरे

Udgir News : महाविद्यालयीन जीवनातील मित्रत्व कायम स्मरणात ठेवून मित्राच्या मुलीचा विवाह आपल्या मुलासोबत करून मैत्री निभावणारे शिवराज पाटील चाकूरकर यांनी उदगीरकरांवर खूप प्रेम केले. उदगीरचे हावगीस्वामी महाविद्यालय असो की तोंडारपाटी येथील प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखाना, दोन्हीच्याही उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

उदगीर येथील ॲड. माधवराव पाटील कौळखेडकर, ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर व शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil) हे तिघे महाविद्यालयीन जीवनातील मित्र. त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात एकत्रित शिक्षण घेतले. ते महाविद्यालयीन जीवनापासूनचे मित्र असल्याने चाकूरकर यांचे नेहमीच उदगीरला येणे-जाणे असायचे. ॲड. कौळखेडकर यांची मुलगी डॉ. अर्चना पाटील यांचा विवाह शैलेश पाटील चाकूरकर यांच्यासोबत झाला.

महाविद्यालयीन जीवनापासूनचे मित्रत्व जोपासून मित्राची मुलगी आपल्या घरी सून म्हणून स्वीकारून मैत्रीला नात्यात रूपांतरित करणारे चाकूरकर सातत्याने उदगीरशी संलग्न राहिले. त्यात त्यांनी उदगीरकरांच्या मागणीला स्वीकारून श्री गुरु हावगीस्वामी यांच्या नावाने महाविद्यालयाची उभारणी करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला.

उदगीरच्या तोंडार पाटी येथील प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी होत असताना तत्कालीन मुख्यप्रवर्तक माजी खासदार अरविंद कांबळे यांना लागेल ते सहकार्य करून कारखान्याच्या उभारणीतही चाकूरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. उदगीर नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक विकास कामांना चाकूरकरांनी अनेकवेळा सहकार्य केले. त्यामुळे उदगीरकरांवरील त्यांचा स्नेह, जिव्हाळा कायम स्मरणात राहणारा आहे.

भरघोस मतांद्वारे निभावले प्रेम

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उदगीरकरांनी भरघोस मते देऊन शिवराज पाटील-चाकूरकरांवर प्रेम केले. डॉ. अर्चना पाटील यांनी उदगीरला उभारलेल्या लाइफ केअर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या उभारणीतही त्यांची भूमिका मोलाची ठरली होती. तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,33 केव्ही उपकेंद्र अशा अनेक ग्रामीण विकासाच्या योजना प्राधान्याने मंजूर करण्यासाठी मदत करणारे व उदगीरवर प्रेम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व हरवल्याने उदगीरकरांवर शोककळा पसरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT