Maharashtra municipal corporation political split news Sarkarnama
मराठवाडा

Shivsena-BJP News : महापालिकेत शिवसेनेसोबत तुटलेली युती, जिल्हा परिषदेत जुळणार का? भाजपचा आज फैसला!

BJP decision on district council alliance : महापालिकेतील तुटलेली युती आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेना-भाजपच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष

Jagdish Pansare

Shiv Sena BJP political update: भाजपने महापालिका निवडणुकीत स्वबळावर मैदान मारले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 57 नगरसेवक निवडून आणत आता कुठल्याही कुबड्या न घेता महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महापालिकेतील शतप्रतिशत विजयानंतर भाजपला दहा हत्तींचे बळ आले आहे. मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहरजिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.

भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामीण भागातून शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते मुलाखतीसाठी संभाजीनगरच्या पक्ष कार्यालयात गर्दी करू लागले आहेत. भाजपमध्ये असलेला हा उत्साह पाहता महापालिके प्रमाणेच भाजप जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार अशा चर्चा आहेत. महापालिका निवडणुकीत तुटेपर्यंत दोन्ही बाजूने ताणले गेल्यामुळे शिवसेना-भाजप युती होऊ शकली नव्हती.

जिल्हा परिषदेत शिवसेनेसोबत युती करायचे की? पुन्हा स्वबळावर लढायचे? याचा फैसला भाजपचे नेते आज घेणार आहेत. यासाठी दुपारी चार वाजता बैठक होणार असल्याचे आमदार संजय केनेकर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढून हात पोळलेल्या शिवसेनेने जिल्हा परिषदेसाठी पुन्हा युतीची भाषा सुरू केली आहे. भाजपनेही आम्ही एकत्र लढू, शिवसेनेसोबत युती संदर्भात चर्चा करू असे केनेकर यांनी सांगीतले असले तरी महापालिका निवडणुकीच्या वेळचा अनुभव पाहता पुन्हा तीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री सावेंची भूमिका राहील निर्णायक..

महापालिका निवडणुकीतील देदीप्यमान विजयाचे श्रेय भाजपच्या सगळ्याच स्थानिक नेत्यांना जाते. परंतु ज्या मंत्री अतुल सावे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य जबाबदारी दिली होती, त्यांना या विजयाचे श्रेय अधिक जाते.

जिल्हा परिषद निवडणुकीतही सावे यांची भूमिकाच महत्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात ते नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

महापालिकेत शिवसेनेला स्वबळावर लढल्यानंतर अपेक्षित यश मिळवता आले नाही. उलट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह पक्षाचे प्राबल्य असलेल्या अनेक प्रभागात भाजपने जोरदार मुसंडी मारली. शिरसाट-जैस्वाल यांची मुलं निवडून आली असली तरी पक्षाला मोठा फटका बसला आहे.

90 पेक्षा जास्त जागा लढवून फक्त तेरा नगरसेवक निवडून आल्याने शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. जिल्हा परिषदेत हे चित्र बदलायचे असेल तर भाजपसोबत युतीशिवाय पर्याय नाही, याची जाणीव पालकमंत्री संजय शिरसाट यांनाही झाली आहे. त्यामुळे महापालिकेत झालं गेलं विसरून शिरसाट यांनी मंत्री अतुल सावे यांना फोन करून युतीसाठी पुढाकार घेतल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT