Shivsena News : वीस वर्षापासून पाण्यासाठी व्याकूळ असलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांची तहान कधी भागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिस्थितीला सत्ताधारी, विरोधक, प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी असे सगळेच जबाबदार आहेत. तरीही शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाने लबाडांनो पाणी द्या, म्हणत आंदोलन सुरू केले आहे. 13 एप्रिलपासून सुरु असलेले हे आंदोलन महिनाभर चालणार असून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितितील मोर्चाने या आंदोलनाचा समारोप होणार आहे.
आज शिवसेना पक्षाच्या (Shivsena UBT) वतीने रिकाम्या हंड्याची पालखी शहरातून काढण्यात आली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील वारकरी परंपरेतील सर्व संतांनी जनतेच्या मनातील आक्रोशाला अभंग आणि भारूडातून वाचा फोडली. संभाजीनगर येथील जनता पाण्याच्या गंभीर त्रासाला सामोरे जात असताना शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संतांच्या पवित्र अभंगातून समाजमनाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
शहरातील एन - 6 परिसरातील आविष्कार चौक येथून ते चिश्तिया चौकपर्यंत रिकाम्या हंड्याची पालखी काढून मनपा प्रशासन आणि राज्य सरकारच्या गैरव्यवस्थापनाचा निषेध केला. 'लबाडांनो पाणी द्या' (Water Supply Issue) या प्रतिकात्मक अभंगांच्या जनआंदोलनात शिवसैनिक आणि नागरिकांनी सहभागी होत आपला आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भेट घेऊन शहराच्या पाणी प्रश्नांबाबत बैठक घेऊन चर्चा केली होती.
शहरातील जनतेला भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नांची दाहकता त्यांच्यासमोर मांडत शहरातील गंभीर झालेल्या पाणीटंचाई आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करत आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. लबाडांनो पाणी द्या, म्हणत सर्वसामान्यांच्या पाणी 13 एप्रिल रोजी आंदोलन सुरू करण्यात आले. शहराची 1680 कोटींची योजना 2700 कोटी रुपयांच्या पुढे नेऊन ठेवली आजच्या सरकारने.
आणि यातील 950 कोटींचा भार आपल्या शहरवासीयांच्या माथी माराल्याचा आरोप शिवसेनेने केला. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रोश मोर्चा काढला होता आणि नंतर खोटी आश्वासने दिली. आता आम्ही त्या प्रत्येक आश्वासनाची आठवण करून देऊ आणि प्रशासनाला लोकांच्या नळापर्यंत आणून बसवू, असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.