Shrijaya chavhan, Ashok Chavhan  Sarkarnama
मराठवाडा

Nanded News : वर्षभरानंतर ठरले ! नांदेड उत्तरमधून मैदानात उतरणार श्रीजया चव्हाण

Shrijaya Chavhan In Competition Nanded Uttar Assembly Constituency : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण या मैदानात उतरणार असल्याची चर्चा...

Sachin Waghmare

Shrijaya Chavhan : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वी देशातून भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया ह्यादेखील सहभागी झाल्या होत्या. एवढंच नाही तर भारत जोडो यात्रा वर्षभरापूर्वी नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत त्या पायी चालल्या होत्या. अनेक किलोमीटरचा पल्ला त्यांनी पार केला. या दरम्यान शहरात त्यांचे बॅनर्सदेखील झळकले. तेव्हापासून त्यांच्या राजकारणातील एंट्रीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्या राजकारणातदेखील सक्रिय झाल्या. २६ मे रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया ह्या दोन्ही कन्या त्यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. या बॅनरवर भावी आमदार म्हणून श्रीजया चव्हाण यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्या नांदेड उत्तर अथवा भोकर मतदारसंघातून श्रीजया या विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जुळ्या कन्या आहेत. त्यापैकी श्रीजयाची राजकीय क्षेत्रातील आवड काही वर्षांत दिसून येत होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. श्रीजयाने भारत जोडो यात्रेत सहभागी होत चालता चालता तिने खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्विट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर जणू शिक्कामोर्तबच केले. त्यामुळे आता त्यांच्या राजकीय एंट्रीची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी दोघींचा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. या बॅनरवर भावी आमदार म्हणून श्रीजया चव्हाण यांचा उल्लेख करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये श्रीजयाला आवर्जून सोबत ठेवत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांकडून श्रीजया हिचे भावी आमदार म्हणून लावण्यात आलेले बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधत आहे. यानिमित्ताने चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेड उत्तर, भोकर मतदारसंघातून श्रीजया या विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

नांदेड उत्तरमधून मैदानात उतरणार

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी श्रीजया यांनी सुरू केली असल्याचे समजते. नांदेड उत्तर मतदार संघातून श्रीजया या विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे समजते. दुसरीकडे भोकर मतदारसंघातून त्या निवडणूक लढतील अशीदेखील चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे श्रीजया आगामी विधानसभा निवडणूक नांदेड उत्तरमधून लढविण्याची शक्यता अधिक आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची नात व माजी मुख्यमंत्री अशोक व अमिता चव्हाण यांची कन्या श्रीजया हिचे राजकीय पदार्पण आता निश्चित मानले जात आहे.

श्रीजया चव्हाण यांची कारकीर्द

श्रीजया यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. आई-वडिलांच्या निवडणूक प्रचार काळात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांना भेटल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून वडिलांच्या ‘बॅक ऑफिस’ची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क आदी बाबींवर त्यांचे लक्ष असते. भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

लोकसभेसाठी मीनल खतगावकर यांचे नाव चर्चेत

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी खासदार भास्करराव पाटील- खतगावकर यांच्या स्नुषा मीनल पाटील-खतगावकर यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. भास्करराव पाटील-खतगावकर हे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत, तर दुसरीकडे मीनल खतगावकर या काँग्रेसकडून रिंगणात उतरल्या तर भाजपकडून कदाचित प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता चिखलीकर-देवरे या मैदानात उतरू शकतात. त्यावेळी प्रताप पाटील-चिखलीकर लोहा-कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT