Ajintha Urban Bank scam accused and former Congress MLA Subhash Zhambad granted bail by sessions court with conditions including restriction on foreign travel. Sarkarnama
मराठवाडा

Subhash Zhambad : 125 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका : देश न सोडण्याच्या अटीवर काँग्रेसच्या माजी आमदाराला जामीन

Ajintha Urban Bank Scam : अजिंठा अर्बन बँकेतील 125 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना देश न सोडण्याच्या अटीवर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Jagdish Pansare

High Court News : अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेत सुमारे 125 कोटींचा गैरव्यवहार झालेला आहे. या गैरव्यवहाराच्या दोन गुन्ह्यातील एका प्रकरणात बँकेचा अध्यक्ष, माजी आमदार सुभाष झांबड याला अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश रा. दा. पाटील यांनी काही अटी- शर्तींवर मंगळवारी (ता. दहा) जामीन मंजूर केला.

एक लाख जातमुचकल्यासह न्यायालयाच्या पूर्ण सुनावणीच्या तारखांना हजेरी लावणे, विदेशात जाता येणार नाही, आदी अटी-शर्तीं घालण्यात आल्या आहेत. अजिंठा अर्बन बँकेच्या एका गुन्ह्यात माजी आमदार सुभाष झांबड याला मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातही जामीन मिळाला आहे.

अजिंठा बँकेत बनावट ठेवी दाखवून विनातारण कर्ज देऊन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात ऑक्टोबर 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही ठेवीदारांनीही आपली फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हे दाखल केलेले होते.

एका गुन्ह्यात 98 कोटींचा गैरव्यवहार तर दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये 25 कोटींच्या आसपास ठेवीदारांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी बँकेचा अध्यक्ष, गैरव्यवहार उघडकीस आल्याच्या कालावधीतील विद्यमान संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, काही सनदी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सुभाष झांबड यास तब्बल वर्षभरापेक्षा अधिक काळानंतर अटक अटक झाली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असून, जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. जिल्हा सत्र न्यायालयाने, त्यानंतर औरंगाबाद खंडपीठानेही झांबड याचा जामीन अर्ज नामंजूर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT