Maharashtra ZP results: 12 झेडपीच्या निकालाने 4 आमदारांचा 'वनवास' संपणार; आता पश्चिम महाराष्ट्र अन् कोकणात रंगणार विधानपरिषद निवडणुकीचा थरार

Legislative Council vacancy News : या निकालात भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळालेले दिसून येत आहे. आता या निकालानंतर लगेचच गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद निवडणुकीचे वेध लागले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election
Maharashtra Vidhan Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (9 फेब्रुवारी) जाहीर झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी आणि धाराशिव या जिल्हा परिषदांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निकालात भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळालेले दिसून येत आहे. आता या निकालानंतर लगेचच गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद निवडणुकीचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील एकूण 22 जागांपैकी तब्बल 17 जागा सध्या रिक्त आहेत. मागील काही वर्षांपासून इथल्या नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. इथे निवडून येणारे सदस्यच विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीसाठी मतदान करत असतात. त्यामुळे या निवडणुकाही रखडल्या होत्या. यापूर्वी नगरपंचायत, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election
Dharashiv ZP Election : धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिलेदाराने फक्त एका मताने उधळला गुलाल

आता 12 जिल्हा परिषदांच्या निकालानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातली पुणे, सोलापूर, सांगली-सातारा व रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात विधान परिषदेसाठी तयारी सुरु झाली आहे. या मतदारसंघातील मतदारांची यादी लवकरच निवडणूक आयोगाकडून (Election Commision) प्रसिद्ध केली जाऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील उर्वरित 13 जागांवरील निवडणुका होण्यासाठी उर्वरित 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election
BJP Punjab strategy : पंजाबमध्ये काँग्रेसला खिंडार? बडा नेता पुन्हा भाजपच्या 'पिच'वर उतरणार? पत्नीच्या विधानांनी राजकारण तापले!

रिक्त असलेले 17 स्वराज्य संस्था मतदारसंघ, रिक्त असलेल्या तारखेनुसार पुढीलप्रमाणे :

22 जून 2024 पासून रिक्त: बीड-उस्मानाबाद-लातूर, परभणी-हिंगोली, नाशिक, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, 29 ऑगस्ट 2025 पासून रिक्त: छत्रपती संभाजीनगर-जालना, 1 जून 2024 पासून रिक्त: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, 6 डिसेंबर 2022 पासून रिक्त: पुणे, ठाणे-पालघर, 2 जानेवारी 2022 पासून : सोलापूर, अहमदनगर (अहिल्यानगर) ,23 नोव्हेंबर 2024 पासून रिक्त : नागपूर, डिसेंबर 2022 पासून रिक्त: सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया.

Maharashtra Vidhan Sabha Election
Shivsena UBT : न सभा, न प्रचार... तरीही ठाकरेंचा 'करिश्मा'! 'या' पंचायत समितीवर मिळवली एकहाती सत्ता

यापूर्वी कोण होते आमदार?

यापूर्वी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले हे आमदार होते. तर सोलापूरमधून भाजपचे प्रशांत परिचारक आमदार होते. सांगली-सातारा मतदारसंघातून काँग्रेसचे मोहनराव कदम आमदार होते. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे हे आमदार होते. यावेळी आता या मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीकडून कोण मैदानात उतरणार आणि कोण बाजी मारणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजितदादांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा; ‘होय आमच्यासमोर बोलणं झालं होतं...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com