Satish Chavan Sarkarnama
मराठवाडा

Satish Chavan News: ...म्हणून आमदार सतीश चव्हाणांवर राष्ट्रवादी काँग्रेस 'राजकीय' कारवाई करणार!

Sunil Tatkare on Satish Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

सुषेन जाधव

NCP MLA Satish Chavan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याचबरोबर राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. अशावेळी प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी आणि बंड शमवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. तर प्रसंगी पक्षविरोधी वक्तव्य अथवा कार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरमधून एक बातमी समोर आली आहे. या ठिकाणचे अजित पवारांसोबत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याबाबत ही बातमी आहे.

'मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्‍न हे सरकार सोडवू शकले नाही.' असं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण(Satish Chavan) यांनी मंगळवारी (ता. १५) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले होते. खरंतर दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे. तरीही, या पक्षाच्या एका आमदाराकडून अशाप्रकारचं विधान येत असेल, तर तो एकप्रकारे सरकारला घरचा आहेरच म्हणावा लागत आहे. यावर आता पक्षाने कडक भूमिका घेतली आहे.

चव्हाणांच्या या पत्राची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी चांगलीच दखल घेतली असून, आमदार चव्हाण यांच्यावर दोनच दिवसांत ‘राजकीय’ कारवाई होणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, 'पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने केलेले हे वक्तव्य पक्षहिताला बाधा आणणारे आहेच, शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीलाही बाधा आणणारे आहे. त्यामुळे कोणी कितीही मोठा असला, तरी गुरुवारपर्यंत त्यांच्याविरोधात ‘राजकीय’ कारवाई नक्कीच केली जाईल. त्यामुळे आमदार चव्हाण यांचे मनातील खदखद व्यक्त करणारे पत्र त्यांना भोवणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

याशिवाय, तटकरे यांनी यासंदर्भात माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, आमदार चव्हाण यांचे पत्र वाचनात आले असून, ते अत्यंत गंभीर आहे. त्यांनी पक्षाची शिस्त मोडली आहे. अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही; तसेच यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा करेन. शिवाय सतीश चव्हाण यांच्याशीही बोलून त्यांनी कोणत्या मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे, हे जाणून घेईन. तरीही ते आपल्या विचारावर ठाम असतील, तर त्यांच्यावर तातडीने कारवाईही केली जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT