Charan Waghmare News : चरण वाघमारेंनी हाती 'तुतारी' घेताच, काँग्रेस अन् राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये उफाळून आला असंतोष!

Charan Waghmare Join Sharad Pawars NCP : अपक्ष, भाजप, बीआरएस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार असा राजकीय प्रवास आजवर चरण वाघमारे यांचा झाला आहे.
Charan Waghmare
Charan WaghmareSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : भाजपचे माजी आमदार तसेच तेलंगणचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र निर्माण समितीचे समन्वयक चरण वाघमारे यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. वाघमारे यांना उमेदवारी दिल्यास दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

चरण वाघमारे(Charan Waghmare) भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघतून २०१४च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले होते. त्यांनी या मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व संपवले होते. मात्र २०१९ची निवडणूक येईपर्यंत भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे खटकले. वाद टोकाला गेल्याने चरण वाघमारे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या चरण वाघमारे यांनी बंडाचे निशान फडकावले होते. भाजप उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर ढकलण्यात त्यांना यश आले होते. मात्र विजयाला गवसणी त्यांना घालता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी वाघमारे यांना सुमारे ७९ हजार तर कारेमारे यांना ८७ हजार मते मिळाली होती.

Charan Waghmare
Ashish Deshmukh Vs Anil Deshmukh : '... म्हणून अनिल देशमुखांचे धाबे दणाणले' म्हणत आशिष देशमुखांनी दिले प्रत्युत्तर!

भाजपचे(BJP) प्रदीप पडोळे यांना फक्त ३३ हजार मतांवर समाधान मानावे लागले. यानंतर वाघमारे यांना परत भाजपात आणण्याच्या हालचाली झाल्या. भाजपचे विद्यामान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र या वाटाघाटी फिस्कटल्या. चरण वाघमारे यांना बीआरएसची निवड केली. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली होती. मात्र त्यांचे नशीब पुन्हा रुसले. तेलंगणात बीआरएस पराभूत झाल्याने त्यांनी महाराष्ट्रातून माघार घेतली आहे.

मध्यंतरी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत भेटीगाठी झाल्या होत्या. मात्र तुमसर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये पाऊल टाकले नाही. येथील विद्यमान आमदार राजू कारेमोरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्यांचे तिकीट पक्के आहे. शरद पवार येथे दमदार उमेदवाराच्या शोधात असताना चरण वाघमारे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजताच दोन्ही काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला आहे.

Charan Waghmare
Rajeev Kumar Helicopter Emergency landing : मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या हेलिकॉप्टरचं शेतात आपत्कालीन 'लँडिंग'

अपक्ष, भाजप, बीआरएस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास आजवर चरण वाघमारे यांचा झाला आहे. चार पक्ष फिरून आलेल्या आणि राजकीय निष्ठेशी संबंध नसलेल्या चरण वाघमारे यांना राष्ट्रवादीत घेण्याचे कारण काय असा सवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे. चरण वाघमारे यांना तुमसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने तिकीट दिल्यास आम्ही त्यांचे काम करण्यापेक्षा घरी बसणे पसंत करू, असा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com