Baban Geete-Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : बबन गीते प्रकरणावर सुरेश धस म्हणाले, ‘राजकीय विरोधकांचा कार्यक्रमच करायचा असतो का?’

Baban Geete Case : जे स्वतःला पालकमंत्रिपद म्हणत होते, त्यांच्यामुळे बीड जिल्ह्याचे ‘गॅग्स ऑफ वासेपूर’ असं म्हटलं होतं. त्याच्या पलीकडे काय तयार झालं आहे. परळीत किती खून झाले आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे.

Vijaykumar Dudhale

Beed, 24 December : परळीतील खून प्रकरणात बबन गीते होते का? तरीही त्यांचं नाव त्या प्रकरणात टाकलं. आम्ही बोललो नाही; पण बबन गीते खरंच त्या खून प्रकरणात आरोपी आहे का? राजकारणात विरोधात लोक असतात. आम्हालाही विरोध करणारे आहेत. पण, राजकीय विरोधक आहेत; म्हणून त्याचा कार्यक्रमच करायचा, असं थोडंच असतं, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी बबन गीते प्रकरणावर प्रथमच भाष्य केले.

जे स्वतःला पालकमंत्रिपद म्हणत होते, त्यांच्यामुळे बीड जिल्ह्याचे ‘गॅग्स ऑफ वासेपूर’ असं म्हटलं होतं. त्याच्या पलीकडे काय तयार झालं आहे. परळीत किती खून झाले आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे. परळीतून किती लोक बाहेर गेले आहेत, त्याचीही यादी देतो. या दोन्ही याद्या मी उद्या किंवा परवा देईल. परळीत जे घडत होतं, ते माजी पालकमंत्र्यांना माहिती नाही का, असा सवालही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला.

धस म्हणाले, माझं आता गजनीसारखं झालं आहे. राज्यात 2023-24 या दरम्यान कोण कृषिमंत्री होतं. हे मला आठवत नाही. आता सिन्नरचे माणिकराव कोकाटे कृषिमंत्री झाले आहेत ना. पहिले कृषिमंत्री (Agriculture Minister) कोण होतं, ते मला आठवत नाही. तुम्हाला आठवत असतील तर घेऊन टाका, तुम्ही नाव. माझं काहीही म्हणणं नाही. सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही. कारण मी 35 ची नोटीस दिली नव्हती. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी आठ हजार कोटी रुपये देत असेल आणि त्यातील दोन ते तीन हजार कोटी रुपये सीएससी सेंटरवाले आणि परळीतून जे माननीय एक लाख 42 हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे लोक हडप करत असतील तर हे फार झालं.

मी कुणालाच घाबरत नाही. पण आता जी लिंक जोडायला सुरूवात झाली आहे. ती आता दोन ते तीन दिवसांत येईल. मी सांगितलं ना की बीडचा तो आका 302 मध्येही आहे. हे आकाच्या आदेशाशिवाय होत नाही. संतोष देशमुख खून प्रकरण 9 डिसेंबरला घडलं आणि आठ तारखेला आकानी दारू दुकानाचे परमीट मिळविले आहे. ते दुकान सुरू करण्यासाठी करण्यात आलेले ॲग्रीमेंटही माझ्याकडे आहे, असा दावाही त्यांनी केला.

सुरेश धस म्हणाले, रिसॉर्ट उभारण्यासाठी न मोजता शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. मस्साजोगला जाताना डाव्याला बाजूला रिसॉर्ट उभारण्यात येत आहे. तेथील शेतकरी टाहो फोडत आहेत. मात्र, हे लोक आमची जागा आहे, असे म्हणत आहेत. पण त्यांना कोणीही दाद देत नाही. बीडच्या तहसीदारांकडे तक्रार गेलेली आहे. मात्र, बीडचे तहसीलदार काय झोपा काढत आहेत का? दुसऱ्याच्या शेतातील मुरम उपसा करायचा आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचा. हे कसलं वागणं. याला काही मर्यादा आहेत की नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT