Dhas On Munde : सुरेश धस प्रथमच थेट धनंजय मुंडेंवर बोलले; ‘बीडच्या माजी पालकमंत्र्यांना एखादा तरी मित्र शिल्लक राहिलाय का?’

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील पिस्तुलांच्या परवानगीला शिफारशी कोणाच्या आहेत.? लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्यांचे पूजन करताना हवेत गोळीबार करता तुम्ही. बापाचं लायसन्स आणि पोरगा कमरेला पिस्तूल लावतोय. हे लायसन्स कोणी दिलं?.
Bajrang Sonawane-Suresh Dhas-Dhananjay Munde
Bajrang Sonawane-Suresh Dhas-Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed, 24 December : बीडच्या माजी पालकमंत्र्यांना (धनंजय मुंडे नाव न घेता) एखादा तरी मित्र शिल्लक राहिला आहे का? त्यांच्या जवळचे किती लोक आता त्यांच्याजवळ राहिले आहेत. जे आता बीडचे खासदार झाले आहेत, तेही त्यांचेच मित्र होते. सख्खा भावासारखे राहत होते. मगं कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात. एकदा अंतर्मनाला विचारून ‘खुद्द के अंदर झाँक के देखो’ म्हणावं त्यांना. तुम्ही पहिले असे नव्हता. आता ह्या पाच वर्षांतच तुम्ही असे का वागायला लागले, असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना नाव न घेता विचारला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खूनप्रकरण तसेच, बोगस पीकविमा या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, तुमच्याबद्दल काय काय चर्चा येतात, हे जरा बघा म्हणावं. ती एकटीच माऊली बडबड करते आहे. त्या बीडमध्येच राहतात, वाटतं. आजपर्यंत मी त्यावर बोललो नव्हतो. तसेच पिस्तुलांच्या परवानगीला शिफारशी कोणाच्या आहेत?

बीड जिल्ह्यातील पिस्तुलांच्या परवानगीला शिफारशी कोणाच्या आहेत.? लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्यांचे पूजन करताना हवेत गोळीबार करता तुम्ही. बापाचं लायसन्स आणि पोरगा कमरेला पिस्तूल लावतोय. हे लायसन्स कोणी दिलं?. आम्ही 55 वर्षांचं झालोय, पण आजपर्यंत आमची पोलिसांना चुटकी वाजून बोलायची हिम्मत नाही झाली. हे काय चाललंय बीड जिल्ह्यात, असा सवालही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला.

Bajrang Sonawane-Suresh Dhas-Dhananjay Munde
Pratap Sarnaik : ...याच मंत्रालयात मी अगरबत्ती, कॅलेंडर विकायचो; पदभार स्वीकारताच शिवसेना मंत्र्याचा आठवणींना उजाळा

धस म्हणाले, दुबे प्रकरणातील आरोपी दुसराच दाखवला आहे. पण, संतोष देशमुख खूनप्रकरणातील आक्काच त्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. ते प्रकरण किती लाखांत मिटलं, कसं मिटलं, तेही माझ्याकडं आलं आहे. त्यासंदर्भातील लोक मला भेटायला येणार आहेत.

ज्यांनी परळी शहर सोडलं आहे, त्यांची यादीच मी उद्यापर्यंत मीडियाला देणार आहे. मोक्याचं जमिनी बळाकवणं, दोनशे रुपयांची वस्तू वीस रुपयांना मागायची आणि नाही दिली तर ती आमचीच म्हणायची. एवढं वाईट वागणं असतं काय?

Bajrang Sonawane-Suresh Dhas-Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची प्रणिती शिंदेंनी घेतली भेट; फडणवीसांवर केले गंभीर आरोप

आम्ही तर 1999 पासून आमदार आहोत. आम्ही असं कोणाच्या जमिनी लुबाडलेल्या नाहीत. हे वागणं आणि पद्धत कुठली आहे? अधिकाऱ्यांशी बोलायची त्यांची काय भाषा होती. अगदी आयएएस, आयपीएस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना ते कसं बोलायचं हे मी तुम्हाला खासगीत सांगेन, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com