Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या कुटुंबातूनच 'धाराशिव' लोकसभेची तयारी..? 'भावी खासदार' म्हणून बॅनरबाजी...

Dharashiv Loksabha Election 2024 : 'कार्यकर्त्यांच्या मनातील भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत नक्की पोहोचतील...'

सरकारनामा ब्यूरो

शितल वाघमारे-

Dharashiv News : देशात लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात ही लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर काहीजणांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे मागणी ही केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजी सावंत यांच्या पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची कार्यकर्त्यांनी समाजामध्यमावर भावी खासदार म्हणून पोस्टरबाजी सुरू केली आहे.

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असून यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना या निवडणुकीसाठी उभे राहावे अशी गळ कार्यकर्त्यांमधून घातली जाऊ लागली आहे. त्यांचा सहकारी संस्था, साखर कारखाना, कार्यकर्त्याचे जाळे आणि दांडगा जनसंपर्क आहे.

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे एका जाहीर कार्यक्रमांमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) माफ करा, परंतु आपल्या विनंतीनुसार इनपुट टेक्स्ट दिला गेला नाही. कृपया आपले इनपुट प्रदान करा जेणेकरून त्याचे मराठीत पुनर्लेखन करता येईल.) कार्यकर्त्यांनी धनंजय सावंत यांना भावी खासदार व्हावे अशी घोषणाबाजी केली. यावर धनंजय सावंत म्हणले की, मी या निवडणुकीसाठी कोणाकडे इच्छा व्यक्त तयार केली नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत नक्की पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त करत एकप्रकारे त्यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छेला वाट मोकळी करून दिली आहे.

आतापर्यंत महायुतीतील फक्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातून कोण लोकसभा निवडणूक लढविणार हे कोणी जाहीरपणे सांगितले नव्हते. मात्र, कार्यकर्त्यांच्या पोस्टरबाजी मुळे धनंजय सावंत यांचे नाव आता लोकसभेसाठी पुढे आले आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी सावंत यांना महायुतीने उमेदवारी दिली तर शिवसेना (ठाकरे गटाचे) चे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार ? याची उत्सुकता या मतदारसंघातील नागरिकांना लागून राहिलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव लोकसभे साठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश नेते बसवराज मंगरुळे, भारतीय जनता पार्टीचे माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर,महायुतीतील शिंदे गटातुन उमरगा येथील माजी खासदार रवींद्र गायकवाड ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार, लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम घेणे सुरू केले आहे. तसेच एका माजी आयएएस अधिकाऱ्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT