Ahmednagar Politics: आमदार लंकेंबाबत प्रश्न, खासदार विखेंनी माईक सरकवत आमदार जगतापांची केली कोंडी

Dr Sujay Vikhe Patil, Sangram Jagtap, Nilesh Lanke: आमदार लंकेंना निमंत्रण पोहोचले की नाही, यावर खासदार विखे यांची कृती आणि आमदार जगताप यांची प्रतिक्रिया चर्चेत.
Dr Sujay Vikhe Patil, Sangram Jagtap
Dr Sujay Vikhe Patil, Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: महायुतीच्या मेळाव्याला आमदार नीलेश लंके यांना निमंत्रण पोहोचले की नाही, यावर खासदार सुजय विखे यांची कृती आणि आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. आमदार लंके यांच्या निमंत्रणाचा प्रश्न येताच खासदार विखेंनी त्यांच्यासमोरचा माईक शेजारी बसलेल्या आमदार जगतापांकडे दिला. यामुळे आमदार जगताप यांची कोंडी झाली. ते माईक पुढे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्याकडे सरकवण्याच्या तयारीत असतानाच ते दूर बसल्याचे पाहून शेवटी पत्रकारांच्या प्रश्नांना समोरे गेले.

खासदार विखे आणि आमदार जगताप यांनी आमदार लंके यांच्या निमंत्रणाच्या प्रश्नावर केलेल्या कृतीवर 'महायुतीत अनबन शिगेला', असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळू लागली आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात महायुतीचा मेळावा उद्या (ता.14) सकाळी अकरा वाजता नगर-मनमाड रोडवरील बंधन लाॅन येथे होईल.

या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद झाली. खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप (अजित पवार गट), भाजपचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबूशेठ टायरवाले (शिंदे गट) यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr Sujay Vikhe Patil, Sangram Jagtap
Balasaheb Thorat : कोण संकटात आहे, हे सर्वांना माहित ; बाळासाहेब थोरातांचा टोला...

हा महायुती मेळावा संपूर्ण नगर जिल्ह्याचा आहे. हा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे. महाराष्ट्रात '45 प्लस'चा विजयाचा संकल्प आहे. त्यामुळे हा मेळावा महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे, असे खासदार विखे यांनी सांगितले.

खासदार सुजय विखे यांच्यासमोर पत्रकार परिषद सुरू होण्यापासून माईक होता. या मेळाव्याला महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे उपस्थित राहणार आहेत का ? त्यांना निमंत्रण पोहोचवले आहेत का ? असा प्रश्न करताच, राष्ट्रवादीचे समन्वयक हे आहेत. निमंत्रणाची आणि निरोप पोहोच करण्याची जबाबदारी यांच्याकडे आहे, असे सांगून खासदार विखेंनी हा माईक शेजारी बसलेले आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सरकावला.

अचानक माईक समोर येताच आमदार जगतापांची यामुळे कोंडी झाली. प्रश्न देखील तसात होता. खासदार विखेंसह आमदार जगतापांचे आमदार लंकेंबरोबर असलेले राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. आमदार जगताप यांनी माईक समोर येताच दडपणात आले आणि त्यांनी शेजारी पाहिले. त्यावर राष्ट्रवादीचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड हे काहीसे दूर बसले होते. त्यामुळे आमदार जगताप यांची देखील कोंडी झाल्याने ते प्रश्नाला बळजबरीने समोरे गेले.

'प्रशांत गायकवाड यांच्याकडे सर्वांना निरोप पोहोच केले आहे. राष्ट्रवादीतर्फे त्यांना निरोप पोहोचवला आहे. आम्ही देखील संपर्कात आहोत. आमदार लंके हे महायुतीच्या मेळाव्याला येतील. ते अनुकूल आहेत', असे आमदार जगताप यांनी सांगून माईक लगेच लांब केला.

नो-कमेंट, नेक्स्ट

आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. ही यात्रा काल राहुरीत होती. तिथे राणी लंके यांनी कोणी साखर वाटू किंवा डाळी वाटू, लंके कुटुंबातून एक जण तरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणत्याही परिस्थितीत असू, असे त्या म्हटल्या होत्या. यावर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारताच,'नो-कमेंट, नेक्स्ट', असे म्हणाले.

'मी साखर वाटतोय...'

भाजप महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी 20 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होत आहे. यावर खासदार सुजय विखे म्हणाले,'मला यादीबाबत काहीच माहित नाही. पण मी साखर वाटतो आहे', असे म्हणताच पत्रकार परिषदेत हशा पिकला.

(Edited By- Ganesh Thombare)

Dr Sujay Vikhe Patil, Sangram Jagtap
Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात आमचंही ऐकू नका अन् विरोधकांचही; पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com