Jalna Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : गळतीचे लोण जालन्यात, उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुखासह शिवसैनिक शिंदे गटात! काँग्रेसचे दहा माजी नगरसेवकही धनुष्यबाण हाती घेणार..

In a significant political development in Jalna, ten former Congress corporators, the district chief of Uddhav's Shiv Sena, and hundreds of Shiv Sainiks have decided to join Shinde's Shiv Sena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि परतुर मधून विधानसभेची निवडणूक लढवलेले ए. जे. बोराडे हे आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत.

Jagdish Pansare

Jalna News : गेल्या दोन महिन्यापासून राज्यात विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरात माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला कसे रोखायचे? असा प्रश्न स्थानिक नेत्यांना पडला आहे. पक्षाला लागलेल्या गळतीचे हे लोण आता शेजारच्या जालना जिल्ह्यातही पोहोचले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) जिल्हाप्रमुख आणि परतुर मधून विधानसभेची निवडणूक लढवलेले ए. जे. बोराडे हे आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत. लवकरच पक्षात भूकंपाचा दावा करणाऱ्या काँग्रेसलाही जालन्यात मोठा दणका बसणार आहे. काँग्रेसचे दहा माजी नगरसेवक धनुष्यबाण हाती घेणार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसांपूर्वी जालन्यात मोठा राजकीय भूकंप घडणार असे विधान केले होते. पण हा भूकंप त्यांच्याच पक्षात झाल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात इतर पक्षातून आलेल्या मोठ्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची जोरदार तयारी केली. (Jalna) मात्र या नावांवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संमती मिळाल्यानंतरच काही प्रवेश निश्चित होणार आहेत. तुर्तास काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या काही माजी नगरसेवकांच्या प्रवेशाला संमती मिळाल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.

सायंकाळी सात नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आभार मेळाव्यात काँग्रेसचे कोण कोण माजी नगरसेवक पक्षात प्रवेश करणार आहेत? यांची नावे समोर येतील असे खोतकर यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मात्र काही माजी नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची कबुली दिली. परंतु हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षात होत असते, असे म्हणत आमच्यासाठी हा काही धक्का वगैरे नाही असे सांगितले.

मी केलेल्या भूकंपाचा दावा लवकरच खरा ठरेल असेही गोरंट्यालयांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट करत आपण विधानावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अर्जुन खोतकर यांनी मोठा धक्का दिल्याचे समोर आले आहे. अनेक वर्षापासून शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परतूर मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना आव्हान देणारे ए. जे. बोराडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यातील राजकीय घडामोडी आणि विकास कामे डोळ्यासमोर ठेवून आपण हा प्रवेश करत असल्याचे समर्थन बोराडे यांनी केले आहे.

बोराडे यांच्यासह अनेक शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. परंतु विधानसभा मतदारसंघात बोराडे यांनी 53 हजाराहून अधिक मते मिळवत पक्षाची ताकद दाखवून दिली होती. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक पाहता सत्ताधारी पक्षासोबत राहणे योग्य ठरेल असे म्हणत त्यांनी शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला.एकीकडे शिवसेनेचे नेते, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठक घेत होते तर दुसरीकडे शेजारच्या जालन्यातच पक्ष फुटल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT