Shivsena UBT Politics : अमित शाहांवर टीका पण मोदींना साॅफ्ट काॅर्नर, उद्धव ठाकरेंची रणनीती ठरली!

Shivsena UBT Politics : उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून जय श्रीराम म्हटल्यानंतर जय शिवराय म्हणावे लागेल असे म्हणत मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला तसेच मी हिंदुत्व सोडले नसल्याचे ठणकावले.
Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi
Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Politics : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सभेत विधानसभेतील परावभवाने आपण खचलो नसल्याचे दाखल ठाकरी शैलीतून भाजपवर जहरी टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या टीकेच्या केंद्रस्थानी गृहमंत्री अमित शाह हे होते. त्यांनी अमित शाह यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली. तसेच अमित शाहांनी महाराष्ट्रावर अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार लादल्याचा आरोप केला.

मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय तर अमित शाह किस झाड कि पत्ती है? असे उद्धव ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यावर टोकाची टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जहरी भाषेत टीका करण्याचे सपशेल टाळले.

मोदींवर टीका करण्याचे टाळून आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक नेते आणि अमित शाह यांनाच टार्गेट केले जाणार असल्याची रणनिती उद्धव ठाकरेंची असल्याची चर्चा आहे.

Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi
Uddhav Thackeray : ठाकरेंचे ‘एकला चलो रे'चे संकेत; पण खरचं 'स्थानिक'च्या निवडणुका स्वबळावर लढणं इतकं सोपं ?

पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आजही लोकांमध्ये कायम आहे त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या टीकेमुळे बुमरँग होण्याची शक्यता असल्याने मोदींवर जहीर टीका केली जाणार नसल्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती असण्याची शक्यता आहे.

हिंदुत्वाला साद

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून जय श्रीराम म्हटल्यानंतर जय शिवराय म्हणावे लागेल असे म्हणत मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला तसेच मी हिंदुत्व सोडले नसल्याचे सांगत भाजपने त्यांच्या पक्षातील झेंडातील हिरवा रंग काढून दाखवावा, असे म्हणत हिंदुत्ववादाला साद घालत विधानसभेला लांब गेलेल्या हिंदुत्ववादी मतांशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरेंच्या हातात नेतृत्व?

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्यभर दौरे करणारा नेता उद्धव ठाकरेंना हवा आहे. ते स्वतः तब्बेतीच्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरू शकत नसल्याची चर्चा होत असतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सेनापती म्हणून आदित्य ठाकरे मैदानात असण्याची शक्यता आहे. पडद्यामागून काम न करता मुंबई महापालिकेत आपल्या नेतृत्व दाखवून देतील.

Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi
Supriya Sule On Ajit Pawar : पवारसाहेब रिटायरमेंट घेणार होते; पण त्यामुळे अनेकांची अडचण झाली! सुप्रियाताईंचा अजितदादांना चिमटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com