Ambadas Danve  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : देशमुख यांच्या हत्येचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलिस यंत्रणेकडून व्हावा!

Ambadas Danve Meet Santosh Deshmukh Family at Massajog : दानवे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, यासाठी आपण विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आवाज उठवू, असे सांगितले.

Jagdish Pansare

Beed News: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही राजकीय वर्चस्वातून घडलेली आहे. यामध्ये राजकीय पुढारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. अशावेळी या हत्येची चौकशी जिल्ह्याबाहेरील पोलिस यंत्रणेकडून केली जावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज त्यांनी सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली. राजकीय वर्चस्वातून घडलेल्या या हत्याप्रकरणी कुटुंबीयातील सदस्य तसेच गावकऱ्याकडून सत्य माहिती घेतली. सदरील हत्येत राजकीय पुढारी व पोलीस अधिकारी यांचा सहभाग असल्याची शंका असून जिल्ह्याबाहेरील पोलीस यंत्रणांकडून या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

तसेच आगामी नागपुर येथील हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याची ग्वाही, अंबादास दानवे यांनी देशमुख कुटुंबियांना दिली. देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यापुर्वी सकाळी अंबादास दानवे यांनी बीडचे पोलिस आयुक्त अविनाश बारगळ यांची भेट घेतली होती. कोणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता खून प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशा सूचना दानवे यांनी दिल्या.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची राजकीय सुडातून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर तातडीने कारवाई करा. पोलिस या प्रकरणी हलगर्जीपणा करीत असून, फक्त राजकीय नेत्यांच्या दबावात काम करत आहेत,असे दिसतयं, अशी नाराजी दानवे यांनी या भेटीत व्यक्त केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या गंभीर प्रकरणी कारवाई करण्याचे, निवेदनही यावेळी पोलिस अधिक्षकांना देण्यात आले.

यानंतर दानवे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, यासाठी आपण विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आवाज उठवू, असेही दानवे यांनी सांगितले. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

बीडचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी यावरून विरोधकांनी बीड जिल्ह्याची बदनामी करू नये, असे आवाहन केले. अंबादास दानवे यांनी पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ आणि त्यानंतर देशमुख कुटुंबियाची सात्वंनपर भेट घेतल्यानंतर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण चांगलेच तापणार असे दिसत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT