Nana Patole On Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Patole News : अशोक चव्हाण म्हणतात, नाना पटोलेंची लायकी साकोलीच्या जनतेने दाखवून दिली!

The people have shown the worth of Nana Patole : अशोक चव्हाण यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी, एवढी त्यांची लायकी नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नांदेडमध्ये माध्यमांशी केली होती.

Jagdish Pansare

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. भाजपने राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा राजकीय आणि दोन समाजामध्ये द्वेष वाढवण्यासाठी असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या परभणी दौरा आणि सोमनाथ सूर्यंवशी यांच्या मृत्यूवरून सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा राजकीय होता आणि राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेले विधान असत्य होते,असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी, एवढी त्यांची लायकी नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी काल नांदेडमध्ये माध्यमांशी केली होती.

त्यावरही चव्हाण यांनी पलटवार करत नाना पटोले यांनी काय बोलले मला माहिती नाही, पण साकोलीच्या जनतेने त्यांची लायकी काय? हे दाखवले आहे, असा टोला लगावला. परभणीत उसळलेल्या हिंसाचारानंतर न्यायालयीने कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांवर आरोप सोमनाथला मारहाण करण्यात आली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला.

काल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलतांना सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, सरकारने ती केली असा गंभीर आरोप केला होता. अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना आज उत्तर दिले.

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली का हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. पण कोणी व्यक्ती एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामहून करण्यात आली असा निष्कर्ष चौकशी पूर्वी काढणे हे उचित नाही. राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा राजकीय होता यातून त्यांनी दिलेले हे स्टेटमेंट आहे. परंतु त्यात त्यात सत्यता नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT