Marathwada News : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला. अंतरवाली सराटीत उपोषण, वाशी, मुंबईच्या आझाद मैदानात धडक देत सरकारला नमवले. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरनंतर नोंदीनूसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात नाही, असा आरोप जरांगे पाटील यांचा आहे.
30 मे पासून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यासह इतर दहा मागण्यांसाठी उपोषणाच्या तयारीत ते आहेत. मात्र त्यांच्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मागणीनूसार मराठवाड्यात आतापर्यंत तीन लाखांवर प्रमाणपत्र वाटप झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सर्वाधिक 2 लाख दोन हजार 737 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप एकट्या बीड जिल्ह्यात झाले आहे.
सव्वा दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन आणि त्यानंतर न्यायमुर्ती शिंदे समितीची स्थापना व कुणबी नोंदींचा शोध घेऊन प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय झाला. आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी हैद्राबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आजपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात वाटप झाले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 लाख 99 हजार 989 प्रमाणपत्र वाटप झाली आहेत. यात एकट्या बीड जिल्ह्यातून 2 लाख 2 हजार 737 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे.
म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपाची टक्केवारी 67 टक्के तर इतर सात जिल्ह्यांतील कुणबी प्रमाणपत्रांची संख्या 33 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण 28 लाख 83 हजार 262 नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी 23 हजार 36 कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींची संख्या आहे. त्यानंतर पडताळणी व स्कॅनिंग प्रक्रियेनंतर 22 हजार 737 प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरली. यातून प्रत्यक्षात 2 लाख 2 हजार 737 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. विभागातील ही सर्वोच्च संख्या ठरली आहे.
जिल्हानिहाय कुणबी प्रमाणपत्र वाटप असे
बीड - 2 लाख 2 हजार 737
छत्रपती संभाजीनगर - 23 हजार 620
जालना - 17 हजार 672
परभणी - 17 हजार 746
हिंगोली - 12 हजार 332
नांदेड - 4 हजार 755
लातूर - 2 हजार 646
धाराशिव - 18 हजार 481
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.